Crime News 
देश

Crime News: भाऊ-बहीण घरी मृतावस्थेत, आई गंभीर जखमी; वडिलांबाबत कळताच उडाली खळबळ

Siblings found dead in Delhi: दिल्लीच्या पांडव नगरमध्ये एका घरात जखमी असलेली महिला आणि तिच्या दोन मुलांचा मृतदेह आढळला होता

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दिल्लीच्या पांडव नगरमध्ये एका घरात जखमी असलेली महिला आणि तिच्या दोन मुलांचा मृतदेह आढळला होता. यात आणखी एक अपडेट मिळत आहे. फरार वडिलांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Siblings found dead in Delhi home father body recovered from railway tracks later)

पोलिसांना असा संशय आहे की, व्यक्तीने आपल्या दोन मुलांचा गळा दाबून जीव घेतला आणि पत्नीवर हल्ला केला. त्यानंतर त्याने रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केली. सदर व्यक्ती मयूर विहारमध्ये एक चहाचे दुकान चालवतो. पोलीस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत.

शनिवारी दुपारी पोलिसांना एका व्यक्तीने घटनेची माहिती दिली होती. पांडव नगरमधील शशी गार्डनचे रहिवाशी असलेले मोठे बंधू श्यामजी चौरसिया ( वय ४२ ) बेपत्ता आहेत. याशिवाय घर दुपारपासून बंद आहे, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली होती. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

माहितीनुसार, घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले होते. घराला बाहेरुन कुलूप लावलेले होते. घराच्या आतून घाण वास येत होता. त्यामुळे घराचे कुलूप तोडण्यात आले. घरातील दृश्य पाहून पोलिसांना धक्काच बसला. घरामध्ये भाऊ-बहिणींचा मृतदेह पडला होता. तसेच, मुलांची आई शन्नो ( वय ४०) बेशुद्ध अवस्थेत पडली होती. महिलेला गंभीर दु:खापत झाली असून हॉस्पिटलध्ये उपचार सुरु आहेत.

कार्तिक ( वय १५) आणि आस्था ( वय ९) असं मृत भाऊ-बहिणींचे नाव आहे. घरातील दृश्य पाहून सर्वच चक्रावले होते. पण, काही तासांनीच पोलिसांना आणखी एक माहिती मिळाली की, रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह श्यामजी याचा होता.

पोलिसांना असा संशय आहे की, श्यामजीने आधी मुलांना संपवलं, त्यानंतर पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. घरापासून जवळच असलेल्या रेल्वे रुळावर श्यामजीचा मृतदेह आढळून आला. वडिलांनी आपल्याच कुटुंबियांना का संपवलं यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. (Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT