पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी ते प्रवास करत असलेल्या जीपवर गोळीबार केल्याने अन्य दोघे जखमी झाले. दरम्यान हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. पंजाब सरकारने मूसेवालासह ४२४ लोकांचे सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर हा हल्ला झाला. यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. (know everything about punjab singer sidhu moose wala)
कोण आहे सिद्धू मुसेवाला?
सिद्धू मुसेवाला हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील मोठे गायक होते. याशिवाय त्यांनी २०२२ साली मानसा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मुसे गावात झाला. त्यांचे खरे नाव सुभदीप सिंग सिद्धू होते. मुसेवालाचे वडील भोला सिंग हे माजी लष्करी अधिकारी आहेत. तर त्यांची आई चरण कौर या गावाच्या सरपंच आहेत. मुसेवाला सहाव्या वर्गापासून हिप हॉप गाणी ऐकू लागला. तर लुधियानाच्या हरविंदर बिट्टू यांच्याकडून त्यांनी गायन शिकले. मुसेवाला यांनी लुधियानाच्या गुरु नानक देव अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी घेतली होती.
सिद्धू मुसेवालाच्या गाण्यावरून वाद
सिद्धू मुसेवाला त्याच्या वादग्रस्त पंजाबी गाण्यांसाठी देखील ओळखला जातो, ज्यामध्ये बंदूक गुंडगीरीला प्रोत्साहन दिले जात असे18व्या शतकातील शीख योद्धा माई भागोच्या संदर्भामुळे सप्टेंबर 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'जट्टी जिओने मोर दी बंदूक वरगी' या गाण्याबद्दल वाद झाला होता. त्याच्यावर शीख योद्ध्यांना नकारात्मक पध्दतीने दाखवल्याचा आरोप झाला होता. मुसेवाला यांनी नंतर या प्रकरणी माफी मागितली होती.
सिद्धू मुसेवाला याच्या 'संजू' या आणखी एका गाण्यामुळे जुलै 2020 मध्ये वाद झाला होता. सिद्धू मूसेवालाला AK-47 शूटिंग प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर हे गाणे रिलीज झाले होते. सोशल मीडियावर रिलीज झालेल्या गाण्यात त्याने स्वत:ची तुलना अभिनेता संजय दत्तसोबत केली आहे. मे 2020 मध्ये बर्नाळा गावातील फायरिंग रेंजवर सराव करतानाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर त्याला संगरूर न्यायालयाने नंतर जामीन मंजूर केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.