millionaires in the country  Sakal
देश

कोरोना काळात देशातील करोडपतींच्या संख्येत लक्षणीय वाढ

कोरोना काळात भारतातील अनेक लोकांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या (Job) गेल्या आणि त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला, पण दुसरीकडे अनेक लोकांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. हुरुन अहवालात (Hurun Report) म्हटले आहे की, कोविड-19 महामारीमुळे प्रभावित झालेल्या 2021 मध्ये भारतात 'डॉलर मिलियनेअर' ('dollar millionaire) म्हणजेच सात कोटी रुपयांहून अधिक वैयक्तिक संपत्ती असलेल्या व्यक्तींची संख्या 11 टक्क्यांनी वाढून 4.58 लाख झाली आहे.

तथापि, या कालावधीत वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्वत:ला आनंदी असल्याचे सांगणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, स्वतःला आनंदी म्हणणाऱ्या लोकांची संख्या गेल्या वर्षी ६६ टक्क्यांवर आली आहे. २०२० मध्ये ७२ टक्के होती. (Significant increase in the number of millionaires in the country during the Corona period)

श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढती असमानता-

भारतात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढत्या असमानतेबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच हुरुन अहवालाचे हे निष्कर्ष आले आहेत. नुकत्याच आलेल्या ऑक्सफॅमच्या अहवालातही या विषमतेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अतिश्रीमंतांवर जास्त कर आकारण्याच्या वाढत्या कॉलमध्ये, सर्वेक्षण केलेल्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा कमी लोकांचा असा विश्वास आहे की अधिक कर भरणे हा सामाजिक जबाबदारीचा एक भाग आहे.

2026 पर्यंत डॉलर मिलियनरी 6 लाखांपर्यंत वाढेल

हुरुनच्या अहवालानुसार, 2026 सालापर्यंत भारतातील करोडपतींची संख्या 30 टक्क्यांनी वाढून सहा लाखांपर्यंत पोहोचेल. मुंबईत सर्वाधिक 20,300 करोडपती असल्याचे अहवालात म्हटले आहे. यानंतर दिल्लीत 17,400 करोडपती कुटुंबे आहेत आणि कोलकात्यात ही संख्या 10,500 इतकी आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी अमेरिकेला पहिली पसंती -

सर्वेक्षण केलेल्या दोन तृतीयांश करोडपती लोकांनी सांगितले की ते त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यास प्राधान्य देतील, यूएस ही त्यांची पहिली पसंती आहे. एक चतुर्थांश लोकांची आवडती कार मर्सिडीज बेंझ आहे आणि ते दर तीन वर्षांनी त्यांच्या कार बदलतात. भारतीतल हॉटेल ताज हा सर्वाधिक पसंतीचा ब्रँड म्हणून उदयास आला, तर तनिष्क हा दागिन्यांचा पसंतीचा ब्रँड आहे.

लक्झरी ब्रँडसाठी सर्वोत्तम संधी-

अनस रहमान जुनैद, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक, हुरुन इंडिया म्हणाले की, पुढील दशक हे लक्झरी ब्रँड आणि सेवा प्रदात्यांना भारतात प्रवेश करण्याची उत्तम संधी आहे. येत्या काळात डॉलर करोडपतींची संख्या आणखी वाढणार आहे. मात्र, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढती दरी हा चिंतेचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

Will Jacks Video: RCB चा शतकवीर मुंबई इंडियन्सने घेतला अन् आकाश अंबानी बंगळुरूच्या संघमालकांना थँक्यू म्हणून आला

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT