Covishield Vaccine esakal
देश

बूस्टर डोस म्हणून मान्यता मिळावी; Serumने केंद्राकडे केली मागणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारताच्या औषध नियामकांकडून कोविशील्ड लशीला बूस्टर डोस म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी केली आहे. देशात पुरेशा प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध असल्याकारणाने ही परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचं संकट सध्या आलेलं आहे. भारतात अद्याप एकाही रुग्णाची पुष्टी झाली नसली तरीही इतर 24 देशांमध्ये या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्व खबरदारी म्हणून बूस्टर डोस संदर्भातील चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच, सीरमने ही परवानगी मागितली आहे. अशा प्रकारे बूस्टर डोस म्हणून परवानगी मागणारी सीरम ही भारतातील पहिलीच कंपनी आहे.

केंद्र सरकारने संसदेत असंही सांगितलंय की, लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप आणि कोरोनाबाबत प्रशासनातील तज्ञांचा गट बूस्टर डोसबाबतीतील वैज्ञानिक पुराव्यांचा विचार करत आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राजस्थान, छत्तीसगढ, कर्नाटक आणि केरळ या राज्यांनी केंद्र सरकारकडे बूस्टर डोस उपलब्ध करवून देण्याची मागणी केली आहे.

तब्बल 24 देशांमध्ये ओमिक्रॉनने आता हातपाय पसरले आहेत. आता ओमिक्रॉनने अमेरिकेत देखील शिरकाव केला आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या एका व्यक्तीमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं दिसून आली आहेत. अमेरिकेत आढळलेला ओमिक्रॉन व्हेरियंटचा हा पहिलाच रुग्ण आहे. तर अमेरिकेमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर व्हाईट हाऊसने अमेरिकन नागरिकांना कोरोना लस आणि बूस्टर डोस घेण्याची विनंती केली आहे. जपानमध्येही बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतातही हालचाली गतीमान झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT