Prem Singh Tamang 
देश

Sikkim: बंडखोरी करून स्थापन केला नवा पक्ष, तुरुंगातून बाहेर येऊन झाले CM; सिक्किममध्ये प्रचंड विजय मिळवणारे तमांग कोण?

who is Prem Singh Tamang?: २०१९ मध्ये तमांग यांनी २४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या चामलिंग सरकारला हद्दपार केलं होतं. त्यावेळी एसकेएम पक्षाला १९ जागा मिळाल्या होत्या.

कार्तिक पुजारी

Sikkim Assembly Election Results: सिक्किममध्ये पुन्हा एकदा सिक्किम क्रांतिकारी मोर्चा सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित आहे. सुरुवातीच्या कलानुसार पक्षाला प्रचंड बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे. एसकेएमने सिक्किममधील एकूण ३२ जागांपैकी ३१ जागांवर आघाडी घेतली आहे. शेवटपर्यंत असेच कल असले तर एसकेएमने मोठा विजय मिळवलाय असं निर्विवाद म्हणता येईल. १ जागा एसडीएफला मिळताना दिसत आहे. दुसरीकडे, काँग्रेस-भाजपला याठिकाणी एकही जागा मिळू शकलेली नाही.

प्रचंड विजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दोन्ही जागांवर ते आघाडीवरआहेत. त्यांची पत्नी कृष्णा कुमारी राय नामची-सिंघीथांग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्या देखील आघाडीवर आहेत. २०१९ मध्ये तमांग यांनी २४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या चामलिंग सरकारला हद्दपार केलं होतं. त्यावेळी एसकेएम पक्षाला १९ जागा मिळाल्या होत्या.

तमांग यांनी २०१३ मध्ये स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. त्यापूर्वी ते चामलिंग यांच्या एसडीएफ पक्षाचे सदस्य होते. २०१३ मध्ये बंडखोरी करत त्यांनी सिक्किम क्रांतिकारी पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांना २०१४ मध्ये १० जागा मिळाल्या होत्या.

कोण आहेत प्रेम सिंग तमांग?

नेपाळी भाषिक आई-वडिलांच्या पोटी तमांग यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९६८ साली झाला आहे. त्यांनी दार्जिलिंगमधील एका कॉलेजमधून बीए केलं आहे. त्यानंतर ते एका सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते. समाजसेवेसाठी त्यांनी तीन वर्षानंतर सरकारी नोकरी सोडली अन् ते एसडीएफमध्ये आले. तीन दशकांच्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. १९९४ पासून ते सलग विधानसभा सदस्य आहेत. एसडीएफ सरकारमध्ये ते मंत्री होते. पण, त्यानंतर त्यांचे एसडीएफच्या नेतृत्त्वासोबत मतभेद झाले अन् त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

२०१६ मध्ये तुरुंगवास

१९९४ आणि १९९९ मध्ये सरकारी पैशांची हेराफेरी केल्याप्रकरणी २०१६ मध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलं. शिवाय त्याचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती, पण कोर्टाने निकाल कायम ठेवल्याने त्यांना तुरुंगात जावं लागलं. २०१८ मध्ये ते तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी विजयी घोडदौड सुरु ठेवली आणि २०१९ मध्ये ते मुख्यमंत्री झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT