Sidhu Moose Wala Murder Updates esakal
देश

पंजाबी गायकाची दिवसाढवळ्या हत्या; कॅनडास्थित गँगस्टरनं स्वीकारली हत्येची जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

पंजाबी गायक सिध्दू मुसेवालाची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय.

नवी दिल्ली : पंजाबी गायक सिध्दू मुसेवालाची (Sidhu Moose Wala) गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. मानसा इथं सिध्दूवर गोळी झाडण्यात आली असून या घटनेत सिध्दूचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सिध्दूला काही गुंडांकडून धमक्या येत होत्या. त्यानंतरही पंजाबमधील आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) त्याची सुरक्षा काढून घेतली होती. सरकारनं सुरक्षा हटवल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिध्दूची हत्या करण्यात आलीय.

शनिवारी पंजाब सरकारनं (Punjab Government) सिध्दू मुसेवालासह एकून ४२४ व्हीआयपी लोकांची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये ज्येष्ठ नेते चरणजीत सिंह ढिल्लो, बाबा लाखा सिंह, अकाली दलाचे नेते गनीव कौर मजीठिया, काँग्रेस नेते परगत सिंह, आप आमदार मदन लाल बग्गा यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. सरकारनं हा निर्णय घेण्याआधी एक रिव्ह्यू मिटिंग घेतली होती. त्यानंतर व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेण्यात आला.

पंजाबचे पोलीस (Punjab Police) महासंचालक व्ही. के. भवरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, या हत्येत तीन शस्त्रं वापरण्यात आली होती. मात्र, त्यांनी एके-47 रायफलचं नाव सांगितलं नाही. या हत्येमागं लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीचा हात असल्याचं ते म्हणाले. बिश्नोईच्या जवळचा कॅनडास्थित गँगस्टर लकी उर्फ ​​गोल्डी ब्रार (Goldy Brar) यानं हत्येची जबाबदारी स्वीकारलीय. हे दोन टोळ्यांमधील भांडणाचं प्रकरण आहे. एसएडी नेता विकी मिद्दुखेडा खून प्रकरणात मुसेवालाचा व्यवस्थापक शगनप्रीतचं नाव समोर आलं होतं. त्यामुळेच ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे.

भवरा पुढं म्हणाले, अतिरिक्त फोर्स पाठवण्यात येत आहेत. हे प्रकरण लवकरात-लवकर सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मला आयजी रेंज एसआयटी बनवण्यास सांगण्यात आलंय. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या काडतुसांवरून 3 वेगवेगळी हत्यारं वापरण्यात आल्याचं दिसतंय. सिध्दू मुसेवाला घराबाहेर पडला, तेव्हा वाटेत समोरून दोन वाहनं आली आणि त्यांनी मुसेवालाच्या कारवर गोळीबार केला. त्यानंतर सिध्दूला रुग्णालयात नेलं असता, त्याला मृत घोषित करण्यात आलं. परस्पर वैमनस्यातून हे प्रकरण असल्याचं दिसतंय, असंही त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT