Liquor Policy Scam sakal
देश

Liquor Policy Scam : सिसोदियांचा जामीन अर्ज; २९ रोजी सुनावणी होणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालय २९ जुलै रोजी सुनावणी घेणार आहे. सिसोदिया हे मागील १६ महिन्यांपासून तुरुंगात आहेत, त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर विचार केला जावा, असे सिसोदिया यांच्या वकिलांकडून मंगळवारी न्यायालयास सांगण्यात आले.

यावर न्यायाधीश भूषण गवई, न्यायाधीश संजय करोल आणि न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने २९ तारखेला सुनावणी घेतली जाईल, असे सांगितले. याचिकेची दखल घेत खंडपीठाने सीबीआय तसेच ईडीला नोटीस बजावली.

सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्याची विनंती ॲड. अभिषेक मनू सिंघवी यांनी चालू महिन्याच्या सुरवातीला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे केली होती. त्यानंतर सरन्यायाधीशांनी हे प्रकरण न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश संजय करोल आणि न्यायाधीश संजय कुमार यांच्या खंडपीठाकडे सोपवले होते.

न्यायमूर्ती संजय कुमार यांनी खटल्यातून माघार घेतल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली होती. त्यानंतर सरन्यायाधीशांनी नवे खंडपीठ नेमले होते. नव्या खंडपीठासमोर सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सिसोदिया यांनी याआधी २१ मे रोजी जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र त्यांना दिलासा ​देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT