situation of Kashmir improved Amit Shah  sakal
देश

काश्‍मीरची स्थिती सुधारली; अमित शहा

गृहमंत्री अमित शहा; ‘सीआरपीएफ’चा वर्धापन दिन साजरा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) वर्धापनदिन सोहळा यापुढे दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांत साजरा करण्यात येईल व त्यामुळे या सुरक्षा दलाचे राज्याराज्यांतील जनतेबरोबर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितले. ‘सीआरपीएफ’च्या ८३ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारली, असाही दावा केला.

अमित शहा यांनी सीआरपीएफ कार्यक्रमानंतर सर्व केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या उच्चाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन काश्मिरातील सद्यस्थितीवरही चर्चा केली. यात निमलष्करी दले, केंद्रशासित प्रदेश पोलिस दल व जम्मूत तैनात सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तान सीमेपलीकडून ड्रोनद्वारे काश्मिरात आक्षेपार्ह वस्तू भारतात पाठवत असून त्याच्या घटनाही वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या या ड्रोन कारस्थानावर काय उपाय करता येईल, याबाबतच्या सूचना अमित शहा यांनी ‘सीआरपीएफ’ व सीमा सुरक्षा दलासह सर्व यंत्रणांच्या उच्चाधिकाऱ्यांकडून मागविल्याचे सांगण्यात आले.

जम्मूतील एमए स्टेडिअमवर झालेल्या कार्यक्रमात अमित शहा म्हणाले, की जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्यावर राज्यातील दहशतवादाच्या घटनांमध्ये लक्षणीयरीत्या घट झाली ही वस्तुस्थिती आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर राज्यातील परिस्थिती सुधारत गेली. या राज्यात लोकशाहीचे लाभ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात मोदी सरकारला मोठे यश मिळत असून आमच्या सुरक्षा दलांच्या कामगिरीने विशेषतः काश्मीर खोऱ्यातील दहशतवादावर नियंत्रण मिळविता आले आहे.

निवडणुकीत जवानांची कामगिरी मोलाची

‘सीआरपीएफ’चा वार्षिक सोहळा दिल्लीऐवजी आता देशाच्या विविध भागांत साजरा करण्यात येईल, असे सांगून शहा म्हणाले, की भारत सरकारच्या या निर्णयामुळे देश व सीमांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या या सुरक्षा दलाचे विविध राज्यांतील जनतेबरोबर आत्मीयतेचे संबंध निर्माण होण्यास त्यामुळे मदत होईल. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. याच निवडणुकांत सुरक्षा पुरविण्याच्या व निवडणुका शांततेत पार पडण्याच्या बाबतीत ‘सीआरपीएफ’च्या जवानांनी वर्षानुवर्षे अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT