Six Naxalites killed in encounter between Naxalites and security forces in Chhattisgarh's Narayanpur district  
देश

छत्तीसगडमध्ये सहा नक्षलवाद्यांचा खातमा! या सर्वांवर मिळून होतं सुमारे ४८ लाखांचं बक्षीस

बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत या कारवाईबाबत माहिती दिली.

रोहित कणसे, सकाळ वृत्तसेवा

नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यामध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये सहा नक्षलवाद्यांचा खातमा केल्याची माहिती सोमवारी पोलिसांनी दिली. दोन दिवसांपूर्वी ही चकमक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्वांवर मिळून सुमारे ४८ लाखांचे इनाम होते. हे सर्व नक्षलवादी पीपल लिबरेशन गुरिला आर्मीच्या(पीएलजीए) कंपनी-१ मधील होते.

बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत या कारवाईबाबत माहिती दिली. नारायणपूर जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी सुरक्षा दलांच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ‘माड बचाओ’ या नक्षलवाद मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कारवाईमधील एकाच आठवड्यात पोलिसांना मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे. मागील दीड महिन्यामध्ये नारायणगावमधील ही चौथी मोठी करण्यात आली आहे, असे सुंदरराज यांनी सांगितले.

कुतूल-फरासबेडा आणि कोडामेटा या गावांजवळील जंगलामध्ये शनिवारी पोलिस आणि आठ नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. या कारवाई दरम्यान सहा नक्षलवादी ठार झाले. सुद्रू, वर्गेश, ममता, समीरा, कोसी आणि मोती अशी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. उर्वरित नक्षलवाद्यांची ओळख पटायची आहे. तर दोन नक्षलवादी दाट जंगलात पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. या नक्षलवाद्यांकडून एकूण पाच रायफल, ग्रेनेड लाँचर आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आले आहेत.

कॉन्स्टेबल हुतात्मा


नक्षलवाद्यांशी झालेल्या या चकमकीमध्ये पोलिसांच्या विशेष कृती दलातील एका कॉन्स्टेबल हौतात्म्य आले. नीतेश एक्का (वय २७) असे त्याचे नाव आहे. या चकमकीत दोन कॉन्स्टेबल जखमी झाले असून त्यांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लेखराम नेताम(वय २८) आणि कैलास नेताम (वय ३३)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT