Hyderabad-bus and lorry caught fire esakal
देश

Accident News: हैदराबादला जाणाऱ्या बसला आग लागल्याने सहा जणांचा मृत्यू, बस जळून खाक

Sandip Kapde

Accident News:

तेलंगणा: बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून हैदराबादला जाणाऱ्या बसची चिल्कलुरीपेटच्या वरिपलेम डोणका येथे हायवाला धडक होऊन बस आणि हायवाला आग लागल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. जखमींना पुढील उपचारासाठी गुंटूर येथे हलविण्यात आले.चिलकलुरीपेटा ग्रामीण पोलीस स्टेशनने याबाबत माहिती दिली आहे. 

जखमींवर चिलाकालुरीपेट शहरातील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गुंटूरला रेफर करण्यात आले. अंजी (३५), उपगुंडुर काशी (६५), उपगुंडूर लक्ष्मी (५५) आणि मुप्पाराजू ख्याती सैश्री (८, सर्व रा. बापटला, आंध्र प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. अन्य दोन मृतांची ओळख पटवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जखमी लोकांनी सांगितले की सोमवारी मतदान केल्यानंतर एकूण 42 लोक बसमध्ये प्रवास करत होते. त्यापैकी एक हायवा ड्रायव्हर, एक बस ड्रायव्हर आणि इतर चार जण जागीच मरण पावले. (road accident News in Marathi)

या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पालनाडू जिल्ह्यातील चिलाकालुरीपेट मंडल येथे हा अपघात झाला. बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम या मंडळातून बस हैदराबादला जात असताना हायवला धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांचे पूर्णपणे नुकसान झाले, असे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT