Vande bharat Sleeper coach Esakal
देश

Sleeper Coach Vande Bharat: नव्या 'वंदे भारत' ट्रेनचे स्लीपर कोच पाहून थक्क व्हालं! रेल्वे मंत्र्यांनी शेअर केले फोटो

ही ट्रेन आणि त्यातील सुविधा कशा असतील सविस्तर जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : वंदे भारत ट्रेन हा भारतीयांसाठी आरामदायी रेल्वे प्रवासाचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. पण आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नवी स्लीपर कोच वंदे भारत ट्रेन तयार होत आहे. या जबरदस्त फीचर आणि सस्पेन्शन असलेल्या कोचची संभाव्य छायाचित्रे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केले आहेत. (Sleeper Coach Vande Bharat see new fabilious sleeper coach Photos shared by Ashwini Vaishnav)

Vande bharat Sleeper coach

चेन्नईच्या फॅक्टरीत तयार कोचेस

या नव्या स्लीपर कोचचे प्रोटोटाईप चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये (ICF) पुढच्या वर्षी फेब्रुवारीपासून तयार होणार आहेत. या कोचचे काही संभाव्य फोटो वैष्णव यांनी मंगळवारी ट्विटरवरुन शेअर केले आहेत.

यामध्ये AC2 टायर कोचच्या अंतर्गत भागाचं दृश्य दाखवणारे हे फोटो आहेत. ही अंतर्गत रचना फायनल झाली असून प्रवाशांच्या कम्फर्टचा विचार करुन ते बनवण्यात आले आहेत. यामध्ये रुंद आणि आरामदायी बर्थ दिसताहेत. तसेच वरच्या बर्थवर जाण्यासाठी पायऱ्यांची सोयही करण्यात आली आहे.

Vande bharat Sleeper coach

इतके असतील बर्थ

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या नव्या वंदे भारत ट्रेनला १६ कोचेस असणार आहेत, यामध्ये केवळ AC1 हा या नव्या प्रकारचा स्लीपर कोच असणार आहे. या ट्रेनमध्ये एकूण ८५७ बर्थ असतील यांपैकी ८२३ बर्थ हे केवळ प्रवाशांसाठी असतील तर उर्वरित ३४ बर्थ हे स्टाफसाठी असणार आहेत.

Vande bharat Sleeper coach

10 ट्रेन्स सुरु होणार

यांतील प्रत्येक कोचला ३० तीन टॉयलेट्स असतील जे सध्या चार आहेत. तसेच यामध्ये एक मिनी पॅन्ट्री देखील असणार आहे. राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी विचारात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत. सध्या केंद्र सरकारच्या PSU, BEML हे ICF साठी अशा प्रकारच्या १० ट्रेन तयार करणार आहेत.

Vande bharat Sleeper coach

लवकरच सुरु होणार एकूण ७५ वंदे भारत ट्रेन्स

देशात सध्या ३३ वंदे भारत ट्रेन्स सुरु आहेत, यातील कोचमध्ये केवळ बसण्यासाठीची सोय आहे. यानंतर अशाच प्रकारच्या आता एकूण ७५ वंदे भारत ट्रेन्स सुरु होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT