Modi_Varanasi 
देश

PM Modi: वाराणसी दौऱ्यादरम्यान PM मोदींच्या कारवर फेकली चप्पल! व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान मोदींच्या गाडीवर जोडा फेकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

वाराणसी : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा सरकार स्थापन करुन प्रधानमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. यानिमित्त मोदींनी आज आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा दौरा केला. यावेळी एका व्यक्तीनं आपली चप्पल मोदींच्या दिशेनं भिरकावली. याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हाटरल झाला आहे. मोदींची कडक सुरक्षा भेदून अशा प्रकारची कृती घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Sleeper thrown on PM Modi bulletproof car during Varanasi visit video went viral)

वाराणसीत जनतेचे आभार मानण्यासाठी वाराणसीचा दौरा केला. यावेळी आपल्या बुलेटप्रुफ कारमधून जात असताना रस्त्याच्या दुतर्फा लोक मोदींचं स्वागत करत होते. पण अचानक यावेळी एकानं पायातील चप्पल मोदींच्या कारच्या दिशेनं भिरकावली ही चप्पल कारच्या बोनेटवर पडली. ही चप्पल कारमध्ये उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकानं चालत्या कारमध्येच हटवली, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं झाला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणारे नरेंद्र मोदी 1 लाख 52 हजार 513 मतांच्या फरकानं विजयी झाले आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. पण मोदी खूपच कमी मताधिक्यानं निवडून आले असं बोललं जात आहे. कारण वाराणसीतून मोदींना यंदा गेल्यावेळेपेक्षा अधिक म्हणजेच ३ लाखांहून अधिक मताधिक्य मिळेलं असं बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर वाराणसीच्या जनेतेनं मोदींविरोधात मतदान केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT