नवी दिल्ली : कथित बेकायदेशीर बार प्रकरणात स्मृती इराणी यांच्या मुलीचे नाव समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नेट्टा डिसूझा आणि काँग्रेस यांना त्यांच्या १८ वर्षांच्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे
तसेच स्मृती इराणी यांनी कॉंग्रेस नेत्यांना लेखी बिनशर्त माफी मागावी आणि तत्काळ प्रभावाने आरोप मागे घेण्यात येण्याची मागणी केली आहे.
गोव्यातील एका बारची मालकी इराणी यांच्या मुलीकडे असून याचा परवानाही बोगस असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना इराणी यांनी, अमेठीत झालेला पराभव गांधी घराण्याला पचवता आलेला नाही. त्यातूनच माझ्या कुटुंबीयांवर असे आरोप होत आहेत असे प्रतुत्यर दिले. तसेच २०२४ मध्ये पुन्हा राहुल गांधी अमेठीतून उभे राहिले तरी ते पराभूत होतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, की माझी मुलगी राजकारण करीत नाही. ती महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. ती बार तर चालवतच नाही. काँग्रेसने आरटीआयच्या आधारे निराधार आरोप केले आहे. परंतु, ज्या आरटीआयबद्दल बोलले जात आहे. त्यात माझ्या मुलीचा उल्लेखच नाही असेही त्या म्हणाल्या.
दोन मध्यमवयीन पुरुषांनी एका १८ वर्षाच्या मुलीची बदनामी केली. त्या मुलीचा एवढाच दोष आहे की, तिच्या आईने २०१४ आणि २०१९ मध्ये अमेठीतून राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांनी आज १८ वर्षाच्या मुलीवर आरोपांच्या फैरी झाडल्या त्या मुलीचा दोष एवढाच आहे की तिची आई स्मृती इराणी ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध पत्रकार परिषद घेते. महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीचा एवढाच दोष आहे की तिच्या आईने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पाच हजार कोटींच्या लुटीवर पत्रकार परिषद घेतली होती, असे इराणी यांनी म्हटले होते.
दरम्यान आता त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांविरोधात कायदेशीर नोटीस पाठवली अशून बिनशर्त माफी मागण्याची तसेच केलेले आरोप मागे घेण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.