Man In Fatehpur Attacked By Snake Every Weekend Esakal
देश

Snake Bites: विचित्र योगायोग! फक्त विकेंडलाच चावतो साप, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतलाय चावा

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तर प्रदेशातील फतेहपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाला एक ते दीड महिन्यात सहा वेळा साप चावला. उपचारानंतर तरुण बरा देखील झाला. भीतीपोटी तरुणाने घर सोडले आणि काकाच्या घरी राहू लागला. मात्र, सापाने त्याला पुन्हा चावा घेतला. त्यामुळे तरुणासह त्याचे कुटुंबीयही त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर उपचार करणारे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत.

हे प्रकरण मलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सौरा गावचे आहे. येथे राहणाऱ्या विकास दुबे याला दीड महिन्यात पाच वेळा साप चावला. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना, २४ वर्षीय पीडित विकास यानी सांगितले की, 2 जून रोजी रात्री 9 वाजता अंथरुणातून उठत असताना त्याला पहिल्यांदा साप चावला, त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याला एका खाजगी नर्सिंग होममध्ये घेऊन गेले. दोन दिवस तिथे दाखल होते. उपचारानंतर तो बरा होऊन घरी आला.

त्याच्या मनात सापांची भीती बसली आणि त्याने खबरदारी घ्यायला सुरुवात केली

ही एक सामान्य घटना असल्याचे कुटुंबीयांना वाटले. यानंतर 10 जूनच्या रात्री त्याला पुन्हा साप चावला, त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केले आणि उपचारानंतर ते घरी गेले. मग त्याच्या मनात सापांची भीती बसली आणि त्यानी खबरदारी घ्यायला सुरुवात केली. मात्र सात दिवसांनंतर 17 जून रोजी घरात पुन्हा साप चावला, त्यामुळे त्याची प्रकृती बिघडू लागली. त्यानंतर त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन तो बरा झाला.

नातेवाईक आणि डॉक्टरांनी घरापासून दूर राहण्याचा दिला सल्ला

चौथ्यांदा सापाने सात दिवसही जाऊ दिले नाहीत आणि चौथ्या दिवशी पुन्हा साप चावला. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. यावेळीही तो उपचारानंतर बचावला. नातेवाईक आणि डॉक्टरांनी काही दिवस घरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार तो राधानगर येथे मावशीच्या घरी राहायला गेला. तेथेही शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याला पुन्हा घरात साप चावला.

मामाच्या घरी सहाव्यांदा सापाने केला दंश

त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला त्याच रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचारानंतर कुटुंबीय त्याला घरी घेऊन गेले. यानंतर तो सौरा गावात काका संतोष दुबे यांच्या घरी गेला. पण, 6 जुलै रोजी दुपारी घरी झोपलेला असताना त्याला सापाने सहाव्यांदा दंश केला. त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तत्काळ त्याच रुग्णालयात दाखल केले जिथे त्याच्यावर यापूर्वी उपचार करण्यात आले होते.

शनिवार आणि रविवारीच साप चावत असल्याचा तरूणाने केला दावा

उपचारानंतर तो पुन्हा बरा झाला आणि डॉक्टरांनी त्याला घरी पाठवले. या तरूणाचा दावा आहे की, त्याला जेव्हा कधी साप चावला होता, तो फक्त शनिवार आणि रविवारीच होता. साप चावण्यापूर्वी प्रत्येक वेळी याची जाणीव होते. त्याचबरोबर प्रत्येक वेळी सर्पदंशाच्या नवीन खुणा आढळून आल्याचे डॉक्टर सांगतात. सर्पविषविरोधी आपत्कालीन औषधे प्रत्येक वेळी दिली जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - टीआरपी क्वीन निक्की तांबोळी घराबाहेर; निक्कीचा बीबीमराठी ५चा घरातला प्रवास संपला

Viral: 'मला तुरुंगात पाठवा, माझ्याकडे...', व्यापारी GST कार्यालयात गेला, अधिकाऱ्यांसमोरच अर्धनग्न होत छेडलं आंदोलन, कारण काय?

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नराधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT