सोशल मीडियावर (social media viral video) व्हायरल झालेल्या वेगवेगळ्या व्हिडिओची नेहमीच चर्चा होत असते. नेटकऱ्यांना ते व्हिडिओ प्रतिक्रिया देण्यास भाग पाडतात. यात अनेकदा काही प्रेरणात्मक व्हिडिओही असतात. तर काहीवेळा गंमतीशीर व्हिडिओनं नेटकऱ्यांचे मनोरंजनही (entertainment) होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या असाच एक गंमतीशीर व्हिडिओ व्हायरल (video viral) झाला आहे. त्यामध्ये नवरी मुलीला लग्नाच्याच दिवशी पाणीपुरी खाय़ची लहर आली. आणि त्यानंतर तिनं केलेल्या अजब मागणीनं सगळेजण चक्रावून गेले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. (social media viral video bride demand paani puri wedding day)
तो व्हिडिओ लग्नासाठी (wedding) तयार झालेल्या नवरीचा असून त्यामध्ये ती आपल्या पतीसोबत पाणीपुरी खाताना दिसत आहे. यावेळी नवरीनं पतीकडे एक अजब मागणी केली आहे. तिची ती मागणी ऐकुन उपस्थित सगळे जण हसु लागतात. नववधूनं अशी काय मागणी केली होती की, त्यामुळे सगळ्यांमध्ये हशा (funny video) पिकला हे आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी खास असतो. त्यादिवसाच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी आणि तो प्रसंग आणखी संस्मरणीय करण्यासाठी हल्ली अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या गंमती जमती करत असल्याचे दिसून आले आहे. त्या व्हिडिओला सोशल मीडियावर शेयर करुन मोठ्य़ा प्रमाणात प्रसिद्धीही मिळवण्याचं काम नवदाम्पत्य करत असतं.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये नववधुला पाणीपुरी खाताना दिसत आहे. तिचा पती त्या दुकानासमोर उभा आहे. ज्यावेळी त्या दुकानदारानं तिला गव्हाच्या पीठापासून बनवलेली पुरी दिली तेव्हा तिनं ती खायला नकार दिला. आणि त्याला सांगितलं की, मला ही पुरी नको आहे. तिनं ती पुरी आपल्या पतीला दिली. आणि त्याला सांगितलं मला ही पुरी नको. दुसरी हवी. यावेळी तिनं हा व्हिडिओ पतीला टॅग करुन लिहिलं आहे की, कुणीही माझ्या पाणीपुरीच्या प्रेमाबद्दल सांगितलं नाही. हे विशेष आहे. याचे काऱण म्हणजे नववधु ही टॅव्हल आणि फॅशन ब्लॉगर देखील आहे. इंस्टावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला आतापर्यत 50 हजार लाईक्स मिळाले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.