Soft Drinks In India esakal
देश

Soft Drinks In India : Gen Z मुळे कमी होतीय सॉफ्ट ड्रिंक्सची लोकप्रियता? काय आहे नापसंतीचे कारण

सध्याची बाजारातील परिस्थिती हे स्पष्ट चित्र दाखवते की, कोल्डड्रींकला लोक नाकारत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Soft Drinks In India :

MBA स्टुडंट असलेल्या २४ वर्षांच्या मुस्कान सिंहला सॉफ्ट ड्रिंक्स आवडायच्या. त्या तिला इतक्या प्रिय होत्या की, दररोज रात्री जेवताना ती त्यांचे सेवन करायची. दररोज ५०० मीलीची एक कोलड्रिंकची बाटली पिण्याची तिला सवय होती.

पण, काही दिवसात तिला लक्षात आलं की, तिचं वजन वाढलं आहे. वजन कमी करण्याचा निश्चय तिने केला. त्यासाठी तिने प्रथम तिच्या आहारात बदल केला. तिने पहिल्यांदा तिच्या सॉफ्टड्रिंकला कायमचा निरोप दिला.

आता मुस्कान असं सांगते की, मी शेवटची सॉफ्टड्रिंक कधी प्यायले होते हे मला आठवतही नाही. ही आठवण फक्त एकट्या मुस्कानची नाही. तिच्यासारखे अनेक तरूण आहेत जे सॉफ्ट ड्रिंक्सपासून दूर आहेत. 

भारताचे तरूण सॉफ्ट ड्रिंक्सपासून दूर राहत आहेत. इतकेच नाही तर ते आता हेल्दी पेयांकडे वळले आहेत. आरोग्य आणि इतर आजारांसाठी जागृत झालेले तरूण गोड पेये, कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्सपासून दूर राहणे पसंत करत आहेत.

हैदराबादमधील सिटीझन्स स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर पापाराव नादाकुदुरू म्हणतात की, 'शीतपेयांशी संबंधित आरोग्य धोक्यांबद्दल जागरूकता वाढल्यामुळे' तरुण ग्राहक त्यांच्या पेयांच्या निवडीबद्दल अधिक विवेकी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.  

पुणे येथील DPU सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार फिजिशियन,डॉ. प्रसाद कुवळेकर असं सांगतात की, जेन झेड शीतपेये खरेदी करताना नैसर्गिक घटकांना प्राधान्य देत आहेत. विशेषत: मर्यादित किंवा जास्त साखर नसलेल्या शितपेयांचा विचार केला जात आहे.

सॉफ्ट ड्रिंकच्या ५०० मिलीच्या बाटलीत ५४ ते ६० ग्राम इतकी साखर असते. आपल्या टेबल स्पूनच्या प्रमाणात हे १३.५ ते १४ चमचे होतात. इतकी साखर आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. 

कोरोना काळात तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल. त्या काळात सर्वकाही बंद झालं होतं. पण,काही गरजेच्या वस्तूंची विक्री सुरू होती. तेव्हा भाजीपासा, फळ यांचे दर वाढले होते.पण, कोल्ड्रिंकचे दर आपटले होते.

२ लिटर कोल्डड्रिंक्सची बाटली ९० रूपयात मिळत होती. कोल्डड्रिंकची मागणी कमी झाल्याने दर उतरले होते, असे तज्ज्ञांनी सांगितले होते. खासकरून जेन झेडने अशा पेयांवर पैसे न खर्च करता आरोग्यदायी पदार्थ अन् पेयांवर पैसे खर्च केले.

भारतात कोल्डड्रींकची मागणी घटली आहे. हे कोणत्याही अभ्यासात स्पष्ट झालेलं नाही. पण, सध्याची बाजारातील परिस्थिती हे स्पष्ट चित्र दाखवते की, कोल्डड्रींकला लोक नाकारत आहेत.

Gen Z ला आवडते हेल्दी लाईफस्टाइल

सध्याची पिढी फास्ट-फूड खाण्याची शौकीन आहे. असे सतत म्हटले जाते. पण, अनेक अभ्यासातून असे स्पष्ट होत आहे की, जनरेशन झेड आरोग्याच्या बाबतील जागरूक आहे. त्यामुळेच, कोल्डड्रींक, फास्ट फूड सेवन करण्यात ते अधिक उत्साही नाहीत.

मिंटेलवर प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसते की, भारताची जेन झेड मधील ३३% लोक स्कीनकेअरच्या उत्पादनांऐवजी हेल्दी पर्यायांकडे वळत आहेत. आरोग्यदायी पेये, खाद्यपदार्थ आणि व्यायाम, योग्य लाईफस्टाईल यांना प्राधान्य देत आहेत.

तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की, आरोग्यदायी लाईफस्टाइल फॉलो करणे, हेल्दी पदार्थांचे सेवन करणे यासोबत कोल्डड्रींकला नाही म्हणणे देखील गरजेचे आहे.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT