Solar Energy  sakal
देश

Solar Energy : वीटभट्ट्यांचे सौर ऊर्जेकडे पाऊल ; उत्तर प्रदेशातील कोळशाऐवजी सौर पॅनेलला पसंती

वीटभट्टीच्या चिमणीतून निघणारा धुर सौर पॅनेलवर जमलेल्या आकाशातील पावसाळी ढगांना बिलगतो आणि त्यातून प्राचीन व आधुनिक तंत्रज्ञानाचे अनोखे मिश्रण होते. पश्चिम उत्तर प्रदेशात सौर ऊर्जा छोट्या-मोठ्या मार्गाने जीवनात बदल घडवत आहे. सौर ऊर्जेमुळे पारंपरिक वीटभट्ट्यांतील प्रदूषण तर कमी झाले आहेच, शिवाय परिसरातील खेड्यांना वीज व डिजिटल जोडणी उपलब्ध झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोडियागंज/पिलाखाना (उत्तर प्रदेश) : वीटभट्टीच्या चिमणीतून निघणारा धुर सौर पॅनेलवर जमलेल्या आकाशातील पावसाळी ढगांना बिलगतो आणि त्यातून प्राचीन व आधुनिक तंत्रज्ञानाचे अनोखे मिश्रण होते. पश्चिम उत्तर प्रदेशात सौर ऊर्जा छोट्या-मोठ्या मार्गाने जीवनात बदल घडवत आहे. सौर ऊर्जेमुळे पारंपरिक वीटभट्ट्यांतील प्रदूषण तर कमी झाले आहेच, शिवाय परिसरातील खेड्यांना वीज व डिजिटल जोडणी उपलब्ध झाली आहे.

विजेची गरज पूर्ण करण्यासाठी उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यातील कोडियागंज, पिलाखाना आणि अकराबादमधील आठ वीटभट्ट्यांनी कोळशाऐवजी सौर पॅनेलचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील ५५५ वीटभट्ट्यांपैकी या आठ वीटभट्ट्यांनी आदर्श निर्माण केला आहे, असे उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटले आहे.

सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या वीटभट्टीचे मालक ओम प्रकाश शर्मा म्हणाले, की सौर पॅनेलच्या उभारणीचा सुरुवातीचा खर्च सात लाखांपर्यंत जातो. मात्र, त्याचे अनेक दीर्घकालीन फायदे आहेत. मी ४५५ वॉटचे प्रत्येकी १६ सौर पॅनेल उभारले आहेत. वीटभट्टीतील जनरेटरमधून वीजनिर्मिती करण्यासाठी या सौर ऊर्जेचा वापर कला जातो. जनरेटरमधून निर्माण झालेली वीज वीटभट्टीसाठी वापरली जाते. प्रत्येक महिन्याला सौर पॅनेलमधून ५० हजारांची बचत होते. त्याचप्रमाणे, वीटभट्टी कामगारांच्या झोपड्यांनाही वीज पुरवठा केला जात असून त्यासाठी अधिक खर्च येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

एरवी अंधारातच राहावे लागणारे वीटभट्टी कामगारही झोपडीत वीज आल्याने आनंदी झाले आहेत. एरवी मोबाईल चार्ज करण्यासाठीही या कामगारांना साडेतीन किमीवरील पिलाखाना येथे जावे लागत होते. त्यासाठी प्रतितास दहा रुपयेही द्यावे लागत होते आता घरीच मोबाईल चार्ज करू शकत असल्याचे अनिल या अठरावर्षीय वीटभट्टी कामगाराने सांगितले. वीज आल्याने घरी अभ्यास करून दहावी उत्तीर्ण होईन, असा विश्वास व्यक्त करत साप व इतर प्राण्यांच्या हल्ल्यांची भीती कमी झाल्याचेही त्याने सांगितले. त्याआधी कामगारांना रात्री दक्ष राहून गस्तही घालावी लागत असे.

केवळ वीटभट्ट्यांचे मालकच सौर पॅनेलमध्ये गुंतवणूक करत नसून कामगारही विजेची आपली दैनंदिन गरज भागविण्यासाठी छोट्या सौर पॅनेलमध्ये गुंतवणूक करत आहेत. ४० वॉटच्या १,७०० रुपयांच्या सौर प्लेटमुळे प्रत्येकी एक पंखा, बल्ब, चार्जिंग पॉईंट चालू शकतो. कामगारांना दर महिना आठ हजार रुपये वेतन मिळते. दररोज एक हजार विटांसाठी त्यांना ३०० रुपये मिळतात.

मी सर्वप्रथम सौर पॅनेल पाहिले तेव्हा ते नक्की काय आहे, हे समजले नाही. ते कोळसा आणि तेलाची जागा घेतील, असे सांगितले गेले. मात्र, या सौर पॅनेलमुळे आम्हाला काय फरक पडेल, याचे आम्हाला आश्चर्य वाटले. आमच्या झोपड्यांत वीज आल्यानंतर आम्हाला खरे महत्त्व समजले. इतके दिवस आम्हाला वीज नसल्याने तेलाच्या दिव्यावरच अवंलबून राहावे लागत होते.

- कलावती, वीटभट्टी कामगार

वीटभट्ट्यांची स्थिती

  • एक लाख

    देशातील एकूण वीटभट्ट्या (अंदाजे)

    २५० अब्ज

  • दरवर्षी निर्माण होणाऱ्या विटा

    १.५ कोटी

  • एकूण कामगार

    ३.५ कोटी टन

  • कोळशाचा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT