Crime News: गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील बुधलाडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याची कुटुंबीयांनी धारदार शस्त्रांनी हत्या करून मृतदेह भाक्रा कालव्यात फेकून दिला होता. गुरप्रीत सिंग आणि गुरप्रीत कौर अशी मृतांची नावे असून ते बोहा येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बोहा येथील रहिवासी गुरप्रीत सिंग आणि गुरप्रीत कौर हे त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गुरप्रीत सिंग आधीच विवाहित होता आणि दोन मुलांचा पिता होता.रविवारी गुरप्रीत सिंग हा आपल्या प्रेयसीसोबत बोहा येथे आला असता प्रेयसीचे वडील सुखपाल सिंग यांनी गुरप्रीत सिंगचा मुलगा अनमोल जोत सिंग आणि त्याचे साथीदार गुरबिंदर सिंग, सहज प्रीत सिंग यांच्यासह अज्ञात व्यक्तीसोबत कट रचला आणि गुरप्रीत सिंग आणि गुरप्रीत कौर यांची हत्या केली. त्यांना शेतात बोलावून धारदार शस्त्रांनी दोघांची हत्या केली.
यानंतर आरोपींनी दोघांचेही मृतदेह गोणीत बांधून कारमध्ये ठेवले आणि भाक्रा कालव्यात फेकून दिले. गुरप्रीत कौरचा मृतदेह भाक्रा कालव्याच्या सरदुलगढ परिसरातून बाहेर पडणाऱ्या नाल्यात सापडला होता, मात्र गुरप्रीत सिंगचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
प्रेयसीचे वडील सुखपाल सिंग घाबरले आणि त्यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या कौन्सिलरला या जोडप्याच्या हत्येची माहिती दिली. हा प्रकार नगरसेवकाच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी गुरप्रीत कौरचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. भाक्रा कालव्यात गुरप्रीत सिंगच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.