Sonali Phogat murder case Haryana govt to write to Goa seeking a CBI probe into the death of Sonali Phogat  esakal
देश

Sonali Phogat : प्रॉपर्टी अन् आरोपी! हत्या प्रकरणात नवा खुलासा

सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गोवा : दिवंगत भाजपच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यांच्या हत्येचा कट रचल्याचं उघड झाल्यानंतर आता सोनाली यांच्या सिक्रेट लॉकर्सचा आरोपीला थेट अॅक्सेस होता ही ताजी माहिती समोर आली आहे. यामुळं आरोपीची नजर सोनाली फोगाट यांच्या संपत्तीवर होती असं सांगितलं जात आहे. (Sonali Phogat aide in jail on murder charges had access to her secret lockers)

सोनाली फोगाट यांचा जवळचा सहकारी असलेला आणि त्यांच्या हत्येचा प्रमुख सुत्रधार असलेला आरोपी सुधीर संगवान जो सध्या तुरुंगात आहे. त्याला सोनाली फोगाट यांच्या सिक्रेट लॉकर्सचा अॅक्सेस होता. दरम्यान, सोनाली यांचं इलेक्ट्रॉनिक लॉकर पासवर्डविना अनलॉक करण्यात अपयशी ठरल्यानंतर पोलिसांनी हे लॉकर सील केलं आहे. तसेच सोनाली यांच्या तीन डायऱ्याही पोलिसांना सापडल्या आहेत.

दरम्यान, सोनाली फोगाट यांच्या पुतण्यानं नुकताचं आरोप केला होता की, सुधीर संगवान यानं सोनाली यांना गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जची सवय लावली होती. तपासादरम्यान पोलिसांनी कर्लीज सेस्तराँचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा हे समोर आलं की, सुधीर सोनाली यांच्या हाताती ड्रिंक्समध्ये जबरदस्तीनं कुठलंतरी ड्रग्ज मिसळत होता.

या घटनेनंतरच २३ ऑगस्ट रोजी सकाळी ४२ वर्षीय सोनाली फोगाट या त्यांच्या हॉटेलमध्ये कोसळल्या त्यानंतर त्यांना गोव्यातील अंजुना येथील सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT