Sonam Wangchuk Sakal
देश

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांचा 'पश्मिना मार्च' मागे; जनतेच्या हितासाठी घेतला यू-टर्न!

Sonam Wangchuk: गेल्या काही दिवसांपासून हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी लडाखमध्ये आंदोलन सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sonam Wangchuk: गेल्या काही दिवसांपासून हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी लडाखमध्ये आंदोलन सुरु आहे. वांगचुक यांनी रविवारी (7 एप्रिल) लेह ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत (LAC) 'पश्मिना मार्च' चा कॉल दिला होता. मात्र, लेह एपेक्स बॉडी (LAB) ने चीनच्या चांगथांग सीमेपर्यंतचा प्रस्तावित मार्च मागे घेतला आहे. जनतेच्या हितासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगितले. प्रशासनाने लेहला युद्धक्षेत्रात बदलल्याचा आरोप LAB ने केला. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींशी कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळण्यासाठी प्रस्तावित मार्च मागे घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष चेरिंग दोर्जे आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह LAB नेत्यांनी लेहमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी शेतकऱ्यांच्या दुर्दशेबद्दल देशातील जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आधीच साध्य केले आहे.

मोर्चा रद्द करण्याबाबत काय भूमिका होती?

दरम्यान, सोनम वांगचुक यांनी एका पोस्टमध्ये म्हटले की, ''पश्मिना मार्चचा उद्देश हा सुरु होण्यापूर्वीच पूर्ण झाला आहे. प्रशासनाच्या आदेशानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत हिंसाचाराची दाट शक्यता आहे. याचा उपयोग या शांततापूर्ण आंदोलनाला देशद्रोही ठरवण्यासाठी होऊ शकतो. भारत-चीन सीमेवरील चराऊ क्षेत्राची स्थिती आता संपूर्ण देशाला माहीत आहे. सध्या सुरु असलेले शांततापूर्ण आंदोलन सुरुच राहणार आहे. देशाच्या विविध भागातून येथे आलेल्या सर्व लोकांचे आम्ही आभार मानतो.''

LAB ला काय म्हणायचे आहे?

LAB ने सांगितले की, ''कायद्याचे उल्लंघन करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. शेतकरी दक्षिणेकडील मोठ्या औद्योगिक प्रकल्प आणि उत्तरेकडील चीनी आक्रमणामुळे मुख्य चराऊ क्षेत्र गमावत आहेत. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा आणि त्याचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा या मागण्यांसह शांततापूर्ण आंदोलन सुरुच राहील.''

आधी सोनम वांगचुक काय म्हणाले होते?

दरम्यान शनिवारी X वरील एका पोस्टमध्ये सोनम वांगचुक म्हणाले होते की, ''लेहला सैन्य, बॅरिकेड्स, स्मोक ग्रेनेड्सने युद्धक्षेत्रात रुपांतरित केले जात आहे. प्रशासनाकडून शांतताप्रिय आंदोलकांना अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक बनवायचे आहे. एवढेच नाही तर लडाखी लोकांना देशद्रोही ठरवायचे आहे. सरकारला फक्त लडाखच्या मतांवर होणाऱ्या परिणामाची चिंता वाटत आहे. तेथील लोकांची किंवा राष्ट्रीय सुरक्षेची नाही.''

काय म्हणाले लेहचे डीएम?

लेहचे डीएम संतोष सुखदेव यांनी शुक्रवारी 7 एप्रिल रोजी कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले. त्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही रॅली किंवा मोर्चा काढू नये असे निर्देश दिले. सुखदेव म्हणाले की, लेहच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी माहिती दिली आहे की, काही लोकांना जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता भंग करायची असल्याचे विश्वसनीय इनपुट होते. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, अशाप्रकारची वक्तव्ये कोणत्याही व्यक्तीने करु नये, असे आदेशात म्हटले आहे. याशिवाय, पोलिसांनी पुढील 24 तास इंटरनेट स्पीड 2G पर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT