songad bhagwan aadinath janmkalyan sohala sakal
देश

Songad News : सोनगडने अनुभवला जन्मकल्याणकाचा उत्साह

भगवान आदिनाथांच्या जन्मानंतरचा जल्लोष आज जन्मकल्याणक सोहळ्याच्या निमित्ताने सुवर्णनगरी सोनगडने अनुभवला.

राजकुमार चौगुले

सोनगड (गुजरात) - भगवान आदिनाथांच्या जन्मानंतरचा जल्लोष आज जन्मकल्याणक सोहळ्याच्या निमित्ताने सुवर्णनगरी सोनगडने अनुभवला. भगवंतांच्या मूर्तीची ऐरावतावरुन काढलेली शोभायात्रा, यात्रेवर ड्रोनरुपी पुष्पक विमानातून झालेल्या रत्नवर्षाच्या आनंदात श्रावक-श्राविका न्हाऊन गेले.

शोभायात्रेचे आगमन पांडुकशिलेजवळ झाल्यानंतर शिलेवर मूर्ती ठेवून हजारो भाविकांनी आणलेल्या पाण्याच्या कलशाद्वारे मूर्तीचा जन्माभिषेक करण्यात आला. भक्तीमय गीतांच्या माध्यमातून गायली जाणारी महती, व ‘जय हो’च्या जयजयकाराने वातावरणातील उत्साह टिपेला गेला.

दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण महोत्सव सुरु आहे. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी जन्मकल्याणक विधीचे आयोजन करण्यात आले. सकाळी आठ ते नऊ या वेळेत सौधर्म इंद्रसभा झाली. इंद्रसभेने अयोध्या नगरीला प्रदक्षिणा घालत भगवंतांच्या जन्माचे स्वागत केले. यावेळी विविध नृत्यांचा अविष्कार दाखवला गेला.

महोत्सवस्थळी उभारलेल्या सभा मंडपाला फेऱ्या मारत शोभायात्रा खास उभारलेल्या पांडुकशिलेकडे रवाना झाली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी टाळ्यांच्या गजरात व जयघोषात स्वागत केले. मंत्रोच्चार करत जन्मकल्याणाचे धार्मिक विधी झाले. दुपारच्या सत्रात जन्मकल्याणक भक्ती, शास्त्र स्वाध्याय आदी कार्यक्रम झाले. सायंकाळच्या सत्रात पाळणा कार्यक्रमासह देश विदेशातील राजांची अयोध्या नगरीला भेट असे कार्यक्रम झाले.

भाविकांना अखंड सेवा

येथे देशभरातून श्रावक-श्राविका पूजेसाठी दाखल होत आहेत. अनेक भागांतून संयोजकांनी खास वाहनांची सोय केल्याने पूजास्थळी भाविक दररोज दाखल होत आहेत. नोंदणी करून आलेल्या सर्व भाविकांची सोय संयोजकांनी केली आहे. हेल्प डेस्कद्वारे विविध सुविधा दिल्या जात आहेत.

अल्पोपहार, भोजनाबरोबरच प्रसाधन गृह, लहान मुलांसाठी विश्रांतीगृह, वैद्यकीय सेवाही प्राधान्याने दिल्या जात आहेत. यासाठी ट्रस्टींसह स्वयंसेवक अखंड सेवा देत आहेत. येत्या दोन दिवसांत देशांतील अनेक महत्त्वाच्या व्यक्तीं महोत्सवाला भेट देण्याची शक्यता आहे.

आजचे कार्यक्रम

मंगळवारी (ता. २३) सकाळपासून तपकल्याणक विधी होतील. यामध्ये ऋषभकुमार राज्याभिषेक, राजा ऋषभदेव वैराग्य, दिक्षेसाठी वनप्रस्थान, दीक्षा ग्रहण विधी आदीसह शास्त्र स्वाध्यायाचे नित्य विधी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT