नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन संसद भवनात सुरू झाले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नारी शक्ती वंदन विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात आलं. दरम्यान, हे महिला आरक्षण विधेयक आमचेच असल्याचं सोनिया गांधी यांनी मंगळवारी सांगितले. सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असंही काँग्रेसने सोमवारी सांगितले.
मंगळवारी संसदेत सोनिया गांधी म्हणाल्या की, ते विधेयक आमचे आहे. एका दिवसापूर्वीच ट्विटरवरील एका पोस्टमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले होते, "आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि विधेयकाच्या तपशीलाची वाट पाहत आहोत. मात्र विशेष अधिवेशनाच्या आधी सर्वपक्षीय बैठकीत यावर अधिक चांगल्या प्रकारे होऊ चर्चा होऊ शकली असती. गुप्ततेच्या बुरख्याखाली काम करण्याऐवजी सर्वसहमतीने हे करता आलं असतं, असंही रमेश यांनी म्हटलं.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मंगळवारी म्हटलं की, महिला आरक्षण विधेयक मांडल्याने हा काँग्रेस आणि यूपीए सरकारमधील त्यांच्या मित्रपक्षांचा विजय आहे. हे विधेयक यूपीए सरकारच्या काळात 9 मार्च 2010 रोजी राज्यसभेत मंजूर झाले होते, परंतु लोकसभेत ते मंजूर होऊ शकले नव्हते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.