Rahul Gandhi Sonia Gandhi Priyanka Gandhi Sakal
देश

काँग्रेस अध्यक्ष निवडीच्या तोंडावरच गांधी परिवार परदेश दौऱ्यावर

सोनिया गांधींसह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा हेदेखील परदेश दौऱ्यावर जाणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधींवर सध्या ईडीची टांगती तलवार आहे. इकडे काँग्रेस पक्ष २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीत आहे. सध्या देशभर त्यांनी भारत जोडो यात्रेची घोषणा केलीय. या सगळ्या धामधुमीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ब्रिटनला जाणार आहे. (Sonia Gandhi to be in foreign for medical check up)

सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी ब्रिटनला जाणार आहे. काँग्रेसचे महासचिव आणि खासदार जयराम रमेश यांनी याबद्दलचं निवेदन प्रसिद्ध केलं आहे आणि सोनिया गांधींच्या परदेश दौऱ्याची माहिती दिली आहे. सोनिया गांधी या चेकअपनंतर आपल्या आईला भेटायलाही जाणार आहेत. त्यांची आई सध्या आजारी आहे. काँग्रेस अध्यक्ष निवडीच्या तोंडावरच गांधी परिवार परदेश दौऱ्यावर जाणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा हेदेखील त्यांच्यासोबत असतील. सोनिया गांधी दौऱ्यावरुन परत कधी येतील, याबद्दल पक्षाने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र काँग्रेसची नियोजित आंदोलनं, कार्यक्रम होणार आहेत. दिल्लीत ४ सप्टेंबरला 'महंगाई पर हल्लाबोल' रॅलीचं आयोजन कऱण्यात आलं आहे. राहुल गांधी या रॅलीच्या अग्रभागी असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT