sonia gandhi rahul gandhi esakal
देश

Sonia Gandhi : ''माझं लेकरु तुम्हाला सोपवत आहे... तो तुम्हाला निराश करणार नाही'', सोनिया गांधी भावुक

सकाळ डिजिटल टीम

Raebareli Lok sabha election 2024 : रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी यांच्या प्रचारसभेसाठी सोनिया गांधींची उपस्थिती होती. यावेळी पुत्रासाठी सोनिया गांधी भावुक झाल्याचं बघायला मिळालं.

रायबरेलीमध्ये बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, मी माझा मुलगा तुमच्या स्वाधीन करत आहे, तुम्ही जसं मला तुमचं म्हणून सांभाळलं तसं राहुलला सांभाळा. राहुल तुम्हाला निराश करणार नाही, याची मी खात्री देते, अशा भावना सोनिया गांधींनी व्यक्त केल्या.

‘‘ गांधी कुटुंबाकडून मला जी शिकवण मिळाली तीच मी राहुल आणि प्रियांका यांना दिली. सर्वांचा आदर करा, एखाद्या कमकुवत घटकासाठी लढायची वेळ आली तर लढा. संघर्षाची तुमची पाळेमुळे आणि परंपरा या मजबूत आहेत. मी तुम्हाला माझा मुलगा सोपवित आहे. जसे तुम्ही मला आपले मानले तसेच राहुलला देखील आपले माना. राहुल तुम्हाला कधीच निराश करणार नाही,’’ असे भावुक उद्‍गार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी काढले. त्या येथे आयोजित सभेत बोलत होत्या. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव देखील या सभेमध्ये सहभागी झाले होते.

पुढे बोलताना सोनिया म्हणाल्या, ‘‘बऱ्याच दिवसांनंतर मला तुमच्यात येण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. खासदार या नात्याने मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. ते माझ्यासाठी खूप मोठे भांडवल आहे. गेल्या शंभर वर्षांपासून आमच्या घराण्याची पाळेमुळे ही या मातीशी जोडल्या गेली आहेत. इंदिरा गांधी यांच्या मनात रायबरेलीसाठी वेगळे स्थान होते. त्यांचे तुमच्यावर अतिव प्रेम होते.’’ रायबरेली हा गांधी कुटुंबीयांचा गड मानला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT