Cough syrups : मागल्या महिन्यात औषध तंत्रज्ञान सल्लागार मंडळ ((DTAB)ची बैठक घेण्यात आली होती. ज्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप घेण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. बैठकीत फक्त शुगर फ्री हर्बल औषधी वनस्पतींच्या अर्कापासून बनवण्यात येणाऱ्या कफ सिरपला सूट देण्यात आली.
कफ सिरपची विक्री डॉक्टरांच्या पिस्क्रिप्शन शिवाय करावी की नाही यावर शासन गांभीर्याने विचार करत आहे. RMPs (Registered Medical Practitioner) ची आवश्यकता तपासण्यासाठी तज्ञांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.
भारतात सध्या विविध कंपन्यांचे आणि विविध प्रकारच्या घटकांपासून बनलेले कफ सिरप विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्ड (DTAB) ही भारताची सर्वोच्च औषध सल्लागार संस्था आहे. गेल्या महिन्यात सुक्या IVY (औषधी वनस्पतींच्या अर्कापासून बनलेले कफ सिरप) पासून तयार करण्यात येणाऱ्या कफ सिरपला सूट देण्याच्या प्रस्तावावरही विचार करण्यात आला.
मात्र, या सगळ्या प्रकरणाचा विचार करून डीटीएबीने शिफारस केली की, विविध कफ सिरप पिस्क्रिप्शनच्या आवश्यकतेची तपासणी करण्यासाठी एक उपसमिती नेमण्यात यावी. तसेच ही समिती औषधी वनस्पतींच्या अर्कापासून तयार करण्यात आलेल्या कफ सिरपला सूट देण्याच्या शिफारसीवरही विचार करेल. (Health)
अलिकडच्या काळात भारताने बनवलेले कफ सिरप (Medicines) अनेकांच्या तपासात आहेत. कारण अनेक देशांत भारतनिर्मित कफ सिरपचा संबंध त्यांच्या देशातील मुलांच्या मृत्यूशी जोडण्यात आला. याच कारणाने संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी कफ सिरपसाठी पिस्क्रिप्शन बंधनकारक करण्याची ही शिफारस बैठकीत करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.