Sandeshkhali_CBI_email 
देश

Sandeshkhali eMail: संदेशखाली प्रकरणी CBIनं तयार केला विशेष ईमेल; पीडितांना तक्रारी दाखल करण्याचं आवाहन

अवघ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या संदेशखाली प्रकरणामध्ये आता एक मोठी घडामोड समोर आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोलकाता : अवघ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या संदेशखाली प्रकरणामध्ये आता एक मोठी घडामोड समोर आली आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून या तपास यंत्रणेनं या प्रकरणात आणखी काही पीडित असतील त्यांना एका खास ई-मेलवर तक्रारी नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळं या संदेशखाली प्रकरणी आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या हालचाली वाढल्या आहेत. (special email created by CBI in Sandeshkhali case appeal to victims to file complaints on it)

याप्रकरणी कोलकाता हायकोर्टानं सीबीआयला महत्वाचे निर्देश दिले होते, त्याला अनुसरुन सीबीआयनं संदेशखाली प्रकरणी तक्रारी स्विकारण्यासाठी sandeshkhali@cbi.gov.in हा विशेष ई-मेल तयार केला आहे. या ई-मेलवर नॉर्थ २४ परगाना जिल्ह्यातील संदेशखलीतील रहिवाशांना तक्रारी दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

१० एप्रिल २०२४ रोजी कोलकाता हायकोर्टाच्या विभागीय खंडपीठानं यासंदर्भात सीबीआयला निर्देश दिले होते. तसेच नॉर्थ २४ परगाना जिल्ह्याचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी सीबीआयला विनंती केली होती की, हा ईमेल आयडी स्थानिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्याची प्रसिद्धी देखील केली जावी. तसेच कोर्टाच्या आदेशानुसार हा ईमेल सर्वदूर पोहोचवण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रांत याची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात यावी. (Marathi Tajya Batmya)

संदेशखालीत काय घडलं होतं?

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या माहितीनुसार, संदेशखाली इथल्या पीडित महिलांकडून त्यांच्या जमिनी बळकावणे आणि लैंगिक अत्याचाराच्या १८ तक्रारी आल्या आहेत. यामध्ये दोन तक्रारी या बलात्काराबाबतच्या आहेत. अनेक वर्षांपासून संदेशखालीत हा प्रकार सुरु होता त्यामुळं इथल्या महिला भीतीच्या सावटाखाली जगत होत्या.

पश्चिम बंगालमधील बाहुबली नेता आणि तृणमूल काँग्रेसचा आमदार शहाजहाँ शेख आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून संदेशखाली या गावातील दलित महिलांच्या जमिनी धमकावून बळकावल्या तसेच त्यांच्यावर लैंगिक अत्याचारही केले. शहाजहाँ याच्यावर कलम १४७, १४८, १४९, ३५३, ४२७, ३२३, ५०६, ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो ५५ दिवस फरार होता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT