सर्वात धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारताचे सीडीएस बिपिन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. वायुसेनेच्या MI17 V5 नावाच्या हेलिकॉप्टरमधून रावत प्रवास करत होते. रशियन बनावटीचं हे हेलिकॉप्टर त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्टयांसाठी प्रसिद्ध आहे. MI17 V5 ची ओळख ही त्याच्या अत्याधुनिकपणासाठी आहे. आपण त्या हेलिकॉप्टरविषयी जाणून घेणार आहोत.
MI17 V5 या हेलिकॉप्टरनं आतापर्यत वेगवेगळ्या लष्करी मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. त्याची बनावट रशियन देशानं केली आहे. या हेलिकॉप्टरचा वापर हा प्रामुख्यानं सैन्याची ने आण तसेच आर्मीच्या वस्तुंच्या ट्रान्सपोर्टसाठी होतो.
व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या प्रवासासाठी देखील MI17 V5 हे हेलिकॉप्टर वापरले जाते. सर्च ऑपरेशन, पेट्रोलिंग याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे रिस्क्यु ऑपरेशन करण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. या हेलिकॉप्टरचा ताशी वेग 250 किमी प्रति तास इतका असून ते सहा हजार मीटर उंचीपर्यत जाऊ शकते. खासकरुन दुर्गम भागामध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी या प्रकारच्या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. एकदा इंधन भरल्यानंतर हे हेलिकॉप्टर 580 किमीचा प्रवास करते. कठीण परिस्थितीमध्ये MI17 V5 महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे दिसून आले आहे.
MI17 V5 चे डिझाईन जगातील सर्वात अत्याधुनिक हेलिकॉप्टरपैकी एक असल्याचे सांगण्यात येते. आपल्याकडे हे हेलिकॉप्टर 2018 मध्ये आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. केवळ भारतच नाही तर जगातील इतर देश देखील या प्रकारचे हेलिकॉप्टर वापरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये अफगाणिस्तान या देशाचा समावेश आहे. 2011 मध्ये या देशाला MI17 V5 हेलिकॉप्टर देण्यात आले होते. साधारणपणे MI17 V5 ची वजन वाहून नेण्याची क्षमता 13 हजार किलो एवढी आहे. तर त्यामध्ये तीस हून अधिक व्यक्ती बसु शकतात. पावसाळा, हिवाळा यासारख्या ऋतुमध्ये प्रभावीपणे कार्य़रत राहण्याची किमया MI17 V5 मध्ये आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.