Special Parliament Session: संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज आजपासून सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासावर चर्चा केली. मोदींनी नेहरूंपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वांचे कौतुक केले.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी संसदीय इतिहासातील योगदानाबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री यांच्यापासून ते अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वांचा उल्लेख केला. सरदार पटेलांपासून ते लालकृष्ण अडवाणींपर्यंतचा उल्लेखही त्यांनी केला. (Latest Marathi News)
जुन्या संसद भवनाच्या आत संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जेव्हा मी पहिल्यांदा संसद सदस्य झालो आणि खासदार म्हणून या इमारतीत पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा स्वाभाविकपणे मी या इमारतीच्या दारात गेलो. पण ज्या क्षणी मी डोकं झुकवून पहिलं पाऊल टाकलं तो क्षण माझ्यासाठी भावनांनी भरलेला होता. रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या गरीब कुटुंबातील एक मूल कधी संसदेत येऊ शकेल याची कल्पनाही केली नव्हती. मला लोकांकडून इतकं प्रेम मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं.
नरेंद्र मोदी म्हणाले, नेहरूजींचे शब्द प्रेरणा देतात. नेहरूजींच्या घोषणा प्रेरणा देतात. नवीन संविधानावर येथे चर्चा येथे झाली. लोकशाहीच्या मंदिराला माझा सलाम आहे, कर्मचाऱ्यांचे योगदान स्मरणात राहील. संसदेत सर्वांचे योगदान राहिले आहे.
सरकारने घेतलेल्या निर्णयांची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेला संबोधित करताना म्हणाले, "या सभागृहात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. येथे जीएसटीचा निर्णय घेण्यात आला. कलम 370 बाबतचा निर्णय येथे घेण्यात आला. वन नेशन, वन टॅक्सचा निर्णय येथे घेण्यात आला."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.