भारतीय विद्यार्थ्यांचा पहिला जथ्था sakal
देश

विशेष विमान युक्रेनकडे रवाना

रात्री उशिरापर्यंत नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल, असे सांगितले जाते.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: युक्रेनमधील स्फोटक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठीच्या मोहिमेत देवदूताची भूमिका बजावणाऱ्या एअर इंडियाचे पहिले विशेष विमान आज रवाना झाले. या २०० आसनी विमानाद्वारे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा पहिला जथ्था आज (ता. २२) रात्री उशिरापर्यंत नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल, असे सांगितले जाते.

एअर इंडियाचे ड्रीमलाइनर बी-७८७ हे विशेष विमान आज सकाळी युक्रेनकडे रवाना झाले. २४ आणि २६ फेब्रुवारीला आणखी दोन विमाने युक्रेनकडे रवाना होणार आहेत. युक्रेनमध्ये १८ हजार विद्यार्थी व अन्य नागरिक मिळून किमान २० हजार भारतीय सध्या रहात असल्याचे तेथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. हे सारे मुख्यतः युक्रेनची राजधानी किव्ह आणि आसपासच्या परिसरात रहात आहेत. तेथील भारतीयांची सुखरूप सुटका हा भारताच्या प्राधान्यक्रमावरील सर्वोच्च विषय असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही स्पष्ट केले. प्रत्यक्षात त्या देशातील अनेक भारतीयांनी तेथील वातावरण अद्याप सुरक्षित वाटत असल्याचे म्हटले आहे. युक्रेनवरील रशियाच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने धडक पावले उचलली आहेत. तेथील भारतीयांना घेऊन येणारे एअर इंडियाचे पहिले विमान किव्हमधील बोरिस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ नंतर दिल्लीकडे उड्डाण करेल.

‘देवदूत’ एअर इंडिया

‘एअर इंडिया’ने यापूर्वीही अनेकदा देवदूताची भूमिका बजावली आहे. कोरोना संकटात लाखो भारतीयांना मायदेशी आणण्यात एअर इंडियाने मुख्य भूमिका बजावली. १९९० मधील इराक-कुवेत युद्धापासून युद्धजन्य परिस्थिती असलेल्या अनेक देशांतील अक्षरशः लाखो भारतीयांना एअर इंडियाने भारतात सुखरूप आणले आहे. इराक युद्धावेळी तर ५९ दिवसांत १० लाख भारतीयांना एअर इंडियाने मायदेशी सुखरूप आणले होते.

ठळक घडामोडी

रशियातील पाच बँका आणि तीन अतिश्रीमंत उद्योगपतींवरब्रिटनचे निर्बंध

रशियाचे अधिकारी आणि बँकांवर निर्बंध लादण्याचा युरोपीय महासंघाचा निर्णय

रशियाकडून नैसर्गिक वायू खरेदी करण्याच्या प्रक्रियेला जर्मनीकडून स्थगिती

ऑस्ट्रिया सरकारचे रशियाच्या राजदूताला समन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT