sri lanka visa free entry for indian visitors and six other countries marathi Travel News  
देश

Travel News : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता भारतीयांना श्रीलंकेत मिळणार 'व्हिसा फ्री' प्रवेश

श्रीलंकेच्या कॅबिनेटने पायलट प्रोजेक्ट म्हणून अनेक देशांना मोफत व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित कणसे

श्रीलंकेच्या कॅबिनेटने पायलट प्रोजेक्ट म्हणून अनेक देशांना मोफत व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. या देशांमध्ये भारताचाही समावेश करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्री साबरी यांनी एका निवेदनात सांगितले की, 31 मार्च 2024 पर्यंत पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची अंमलबजावणी केली जाईल. मंत्रिमंडळाने आतापासूनच भारत, चीन, रशिया, मलेशिया, जपान, इंडोनेशिया आणि थायलंडमधील प्रवाशांना मोफत प्रवेशास मान्यता दिली.

मोफत व्हिसा कधी दिला जाईल?

कर्जबाजारी श्रीलंके हा देशात पर्यटन क्षेत्राची पुनर्बांधणी करण्याच्या प्रयत्नात आहे. यादरम्यान श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने भारत आणि इतर सहा देशांतील प्रवाशांना मोफत टूरिस्ट व्हिसा देण्याच्या धोरणाला मंजुरी दिली आहे. श्रीलंकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अली साबरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली कीश कॅबिनेटने पायलट प्रोजेक्ट म्हणून तात्काळ प्रभावाने 31 मार्च पर्यंत भारत, चीन, रशिया, मलेशिया, जापान, इंडोनेशिया आणि थायलँड यांना मोफत व्हिजा देण्यास मंजूरू दिली आहे.

नेमकं कारण काय?

या देशांतील पर्यटकांना श्रीलंकेला भेट देण्यासाठी कोणत्याही शुल्काशिवाय व्हिसा मिळू शकेल. 2019 मध्ये इस्टरच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेतील पर्यटकांचा संख्या खूपच कमी झाली होती. या स्फोटांमध्ये 11 भारतीयांसह 270 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 500 हून अधिक जण जखमी झाले होते. त्याचबरोबर देशात कोरोना महामारी आणि त्यानंतर आलेले आर्थिक संकट यामुळे पर्यटकांची संख्या वाढू शकलेली नाहीये.

फ्री व्हिसा म्हणजे काय?

व्हिसा फ्री ट्रॅव्हलमध्ये तुम्ही व्हिसा न घेता कोणत्याही देशात जाऊ शकता. दोन देशांमध्‍ये या संदर्भात करार असेल किंवा आपण भेट देत असलेल्‍या देशाने परदेशी नागरिकांसाठी एकतर्फी सीमा उघडल्‍यास हे लागू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT