अमरोहा : विश्वचषकात भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावलेले टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या गावाचा कायापालट होणार आहे. शमीच्या गावात आता एक मिनी स्टेडियम उभारण्यात येणार आहे, त्याचबरोबर इतर अनेक सोयी सुविधा इथं उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. अमरोहाचे जिल्हाधिकारी राजेश त्यागी यांनी ही माहिती दिली. (Stadium to be built in Mohammad Shami village Amroha announcement by DM)
जिल्हाधिकारी त्यागी म्हणाले, "मोहम्मद शमी यांच्या गावात एक मिनी स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव आम्ही युपी सरकारकडं पाठवत आहोत. या स्टेडियममध्ये ओपन जिमची व्यवस्था असेल, त्यासाठी पुरेशी जमीनही उपलब्ध आहे. शासनानं राज्यात विविध भागात २० मिनी स्टेडियम उभारण्याचे निर्देश दिले होते. त्यात अमरोहाची देखील निवड करण्यात आली असून आता तिथं स्टेडिअम उभारण्यात येणार आहे" (Latest Marathi News)
मोहम्मद शमी हा भारतीय क्रिकेटपटू असून त्याचा जन्म ९ मार्च १९९० रोजी झाला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो पश्चिम बंगालकडून खेळत होता. शमी हा वेगवान गोलंदाज असून त्याच्या चेंडूची गती ही सरासरी १४५ किमी प्रति तास इतका आहे. तो रिव्हर्स स्विंगसाठी ओळखला जातो. शमीचं मूळ गाव हे उत्तर प्रदेशातील अमरोहा हे आहे. त्यानं २०१३ मध्ये पाकिस्तानविरोधात आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियरची सुरुवात केली होती. या पहिल्याच सामन्यात त्यानं चार निर्धाव षटकं टाकली होती.
दरम्यान, यंदा भारतात होत असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये त्यानं सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतानं या स्पर्धेत फायनलमध्ये धडक दिली असून १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा सामना होणार आहे. पण भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यात शमीचा मोठा वाटा असून त्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये तब्बल ७ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळं भारताचा विजय सोपा झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.