नवी दिल्ली : लोकशाही सुधारणा असोसिएशनने सादर केलेल्या रिपोर्टनुसार तामिळनाडूमधील DMK हा प्रादेशिक पक्ष सर्वांत श्रीमंत आहे. द्रविड मुन्नेट्र कळगम हा तामिळनाडूमधील मोठा राजकीय पक्ष असून सध्या या पक्षाची तामिळनाडूत सत्ता आहे. सध्या भारतात ३१ राजकीय प्रादेशिक पक्ष आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात सर्वांत जास्त खर्च आणि उत्पन्न असलेल्या पक्षांचा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये DMK हा सर्वांत जास्त उत्पन्न असणारा पक्ष ठरला आहे.
(Top Income Of State Parties)
लोकशाही सुधारणा असोसिएशनने शुक्रवारी हा रिपोर्ट सादर केला आहे. त्यामध्ये देशातील ३१ प्रादेशिक राजकीय पक्षांच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये स्टॅलिन हे अध्यक्ष असलेला पक्ष DMK या पक्षाचं उत्पन्न १५० कोटी असल्याचं सांगितलं आहे. तसेच या पक्षाचा २०२०-२१ या आर्थिक वर्षातील खर्च २१८ कोटी आहे. त्याचबरोबर DMK पक्षाच्या वार्षिक उत्पन्नात सर्वांत जास्त वाढ झाली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षातील उत्पन्नापेक्षा २०२०-२१ या आर्थिक वर्षातील उत्पन्नात ८० कोटींची वाढ झाली आहे.
दरम्यान मागच्या आर्थिक वर्षातील देशातील ३१ राजकीय पक्षांचे उत्पन्न ५२९ कोटी इतके होते. त्याचबरोबर पाच पक्षांना देणग्याच्या माध्यमातून २५० कोटी मिळाले असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून या देणग्या आल्याचंही यात स्पष्टीकरण दिलंय. त्याचबरोबर सर्वांत जास्त खर्च केलेल्या पक्षाचीही यादी जाहीर करण्यात आली आहे.
त्यामध्ये DMK पक्षाने २१८.४९ कोटी, तेलुगू देशम पक्ष (Telugu Desam Party) ५४.७६ कोटी, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने ४२.३७ कोटी, जनता दल (संयुक्त) (Janata Dal (United)) २४.३५ कोटी आणि तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाने २२.३५ कोटी रुपये खर्च केला आहे. दरम्यान सर्वांत जास्त उत्पन्न असलेल्या पाच पक्षाचे उत्पन्न ४३४ कोटी आहे. हे उत्पन्न ३१ पक्षांच्या उत्पन्नांपैकी ८२ टक्के इतके असल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रादेशिक पक्षांना इलेक्ट्रॉल बॉण्डद्वारे २५० कोटी मिळाले आहेत. ते त्यांच्या उत्पन्नाच्या ४७ टक्के इतके असल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.