देशातील स्टार्टअप (Start up) इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी शनिवारी (ता. १५) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing) देशभरातील स्टार्टअपशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १६ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याचे सांगितले. २०२२ हे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमसाठी नवीन शक्यता घेऊन आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांचा हा कार्यक्रम शनिवारी सकाळी सुरू झाला. यंदा स्टार्टअप (Start up) इंडिया ही योजना सहाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. सरकारचा एक प्रमुख उपक्रम म्हणून या योजनेकडे पाहिले जाते. देशातील १५० स्टार्टअप्सना एकूण सहा वेगवेगळ्या गटात विभागले आहे. यामध्ये समावेश असणाऱ्या कृषी, आरोग्य, एंटरप्राइझ सिस्टम, अंतराळ, उद्योग, सुरक्षा, फिनटेक आणि पर्यावरणासह विविध क्षेत्रातील स्टार्टअपशी पंतप्रधानांनी संवाद साधला.
मी देशातील सर्व स्टार्टअप्सचे, स्टार्ट-अपच्या जगात भारताचा झेंडा उंचावणाऱ्या सर्व नवोदित तरुणांचे अभिनंदन करतो. स्टार्ट-अपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचावी यासाठी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे, स्टार्टअप्स (Start up) देशाच्या विकासाला मदत करीत आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा या योजनेच्या क्षमतेवर ठाम विश्वास आहे. गेल्या वर्षभरातील योजनेच्या यशस्वितेचा विचार केला असता देशातील स्टार्टअप्सचा आर्थिक घटकावर प्रभाव पडला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिकतेत सकारात्मक आणि आश्चर्यकारक वाढ झाली आहे.
...तेव्हा स्टार्टअप्सची भूमिका महत्त्वाची असेल
स्टार्टअप्स हा नव्या भारताचा कणा असणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा स्टार्टअप्सची भूमिका महत्त्वाची असेल. देशाचे नाविन्यकर्ते जागतिक स्तरावर देशाचा गौरव करीत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.