नवी दिल्ली : ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) वाढत्या रूग्णसंख्या लक्षात घेता केंद्राने ताप आणि घसादुखी (fever And Sore Throat) असणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचाणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोविड टेस्ट (Corona Rapid Antigen Test) जलद करण्याचे देखील निर्देश दिले आहेत. केंद्राने राज्यांना (Center Government Letter To All States ) पत्र लिहून कोरोनाचा वाढता संसर्गाचा दर पाहता रॅपिड अँटीजेन टेस्टचा (RAT) वापर वाढवण्यास सांगितले आहे. वाढत्या संसर्गाबाबत सरकारने राज्यांना इशारा दिला असून, देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग दर वेगाने वाढत असल्याचे केंद्राने म्हटले आहे. (State To Conduct Covid Test In Fever & Sore Throat Cases)
कोरोनाच्या (Coroana Cases raised In India) सध्याच्या वाढीच्या काळात खोकला, डोकेदुखी, घसादुखी, श्वासोच्छवास, अंगदुखी, चव किंवा वास, थकवा आणि अतिसार अशा कोणत्याही व्यक्तीला संशयास्पद मानावे असे सांगण्यात आले आहे. तसेच अशा सर्व व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात यावी. तसेच त्यांना ताबडतोब आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतातील कोरोनाच्या एकूण प्रकरणांपैकी 18 टक्के प्रकरणे ओमिक्रॉनचे आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगच्या एकूण प्रकरणांपैकी 18% प्रकरणांमध्ये ओमिक्रॉन आढळून आला आहे. (Corona Latest News In Marathi )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.