Stone Pelting at Ram Navami Esakal
देश

Stone Pelting at Ram Navami: पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक, अनेक जण जखमी

Stone Pelting at Ram Navami: विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, "रामनवमीच्या दिवशी मिरवणूक काढण्यासाठी प्रशासकीय परवानगी घेण्यात आली होती, परंतु शक्तीपूर, बेलडांगा - II ब्लॉक, मुर्शिदाबाद येथे मिरवणुकीवर हल्लेखोरांनी हल्ला केला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशभरात काल रामनवमीचा उत्साह दिसून आला. काही भागात मिरवणुका काढण्यात आल्या, काही ठिकाणी किर्तन भजन यांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात काल (बुधवारी) रामनवमीच्या मिरवणुकीत मोठी गोंधळ झाला. या ठिकाणी हाणामारी झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी शक्तीपूर परिसरात घडली. रामनवमीनिमित्त येथे मिरवणूक काढण्यात आली. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक त्यांच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करत असल्याचे दिसत आहे.

हिंसक घटनेमुळे तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी पुढे सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आली असून अतिरिक्त फौजफाटा परिसरात पाठवण्यात आला आहे. जखमींना बहारमपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रॅलीवर दगडफेक करण्यात आली आणि दुकानांची तोडफोड केल्याचा आरोप भाजपच्या बंगाल युनिटने केला आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी दिली भेट

पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, "रामनवमीच्या दिवशी मिरवणूक काढण्यासाठी प्रशासकीय परवानगी घेण्यात आली होती, परंतु मुर्शिदाबादच्या शक्तीपूर, बेलडांगा - II ब्लॉकमध्ये मिरवणुकीवर हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी ममता पोलिसही हल्लेखोरांना साथ देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला ज्यामुळे मिरवणूक संपवली, राम भक्तांवर गोळीबार करण्यात आला," असे ते म्हणाले, बुधवारी संध्याकाळी बहरामपूरचे खासदार आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या भागाला भेट दिली.

यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी रामनवमीच्या मुहूर्तावर राज्यात दंगल भडकवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला होता. गेल्या वर्षी, बंगालमध्ये रामनवमीच्या उत्सवादरम्यान हिंसाचार झाला होता, ज्यामुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण झाला होता.

रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवेळी पश्चिम बंगालमध्ये दोन ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा शहरातील मशिदीजवळ मिरवणूक काढल्यानंतर दोन समुदायांमध्ये मारामारी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मेदिनीपूरच्या इग्रा येथेही दोन समुदायांमध्ये मारामारी आणि जाळपोळ झाल्याची माहिती आहे.

हिंसाचारात आतापर्यंत 18 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुले आणि एक महिला यांच्यासोबत काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. भाजप आणि TMC या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर ही घटना घडवून आणल्याचा आरोप केला आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT