रोज नाश्ता काय करायचा असा अनेक घरात प्रश्न पडतो. प्रत्येक वयोगटातल्या लोकांची आवड वेगवेगळी असते. त्याप्रमाणे घरातल्या बाईला पदार्थ ठरवावे लागतात. काही घरांमध्ये पोहे, उपमा, इडली सांबार, ब्रेड-ऑम्लेट असे पदार्थ हमखास बनतातच. पण कधीतरी तुम्हाला तेच खाऊन कंटाळा येऊ शकतो. असेच एका मुलाने आई दररोज देत असलेल्या नाश्त्याबद्दल लिहिले असून त्याने पश्नपत्रिकेवर लिहिलेला निबंध व्हायरल होत आहे.
एका ट्विटर युझरने मुलाच्या उत्तरपत्रिकेचा एक फोटो शेअर केला आहे. प्रश्नपत्रिकेत या मुलाला त्याला आवडत नसलेल्या पदार्थाविषयी प्रश्न विचारला होता. त्यात त्याने आपल्या मनातली खंत व्यक्त केली. त्याने लिहिलेय, आई रोज नाश्त्यासाठी पुट्टू बनवते. रोज तेच काय खायचं? कारण त्याला रोज तोच पदार्थ खाणं आवडत नाही. तसेच त्याने पुट्टू खाण्यास अनेकदा नकार दिल्यामुळे त्याचे त्याच्या आईसोबतही बिनसले आहे. आई वैतागली आहे.
निंबंधात तो पुढे लिहितो, 'मला न आवडणारा पदार्थ म्हणजे पुट्टू. हा केरळचा खाद्यपदार्थ आहे. तांदळापासून हा पदार्थ तयार करतात. तयार करायला सोपा असल्याने माझी आई रोज सकाळी तो करते. पण पाच मिनीटांनी पुट्टूचा दगड झालेला असतो. असा पदार्थ मी खाणार नाही. या पुट्टूमुळे आमचे नाते तोडले आहे, असे म्हणत तो निबंध संपवतो.
पुट्टू हा केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये खाल्ला जाणारा पदार्थ आङे. तो तांदूळ आणि नारळापासून तयार होणारा दंडगोलाकार आकाराचा पदार्थ आहे. मुलाची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यानी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.