डेहराडून : युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाचे ढग अधिक गडद होताना दिसत असून, युक्रेनमध्ये जवळपास 20 हजार भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांना पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान, अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडल्याने पालकांची चिंता वाढली आहे. (Students In Ukraine Shut Down Internet Due To Fear Of Cyber Attack)
दुसरीकडे युद्ध सुरु असल्यामुळे आणि कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे अद्यापपर्यंत मुलीशी बोलणे झालेले नसल्याचे डेहराडून येथील अंजू सिंग यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तसेच सायबर हल्ल्याच्या भीतीने माझ्या मुलीने तिचे वाय-फाय बंद केल्याचे सिंग यांनी सांगितले.
युक्रेनमधील भारतीय कतारमार्गे मायभूमीत परतणार
युक्रेनमधून भारतात परतणारे प्रवासी कतारसोबतच्या भारताच्या द्विपक्षीय हवाई बबल करारानुसार दोहामार्गे प्रवास करू शकतात, अशी माहिती कतारमधील भारतीय दुतावासाने सांगितले आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीचा हवाला यामध्ये देण्यात आला असून, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. (Indian In Ukraine) पूर्व युरोपीय राष्ट्राने त्यांचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू केल्यानंतर युक्रेनसाठी विशेष उड्डाणे पुन्हा सुरू होतील, असे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी गुरुवारी सांगितले आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी काही उड्डाणे नियोजित होती पण रशियाच्या हल्ल्यानंतर ही विमाने अर्ध्या मार्गातून परतल्याचे सिंधिया यांनी यावेळी सांगितले. ज्यावेळी हवाई क्षेत्र पुन्हा सुरू करण्यात येईल त्यावेळी भारतीयांना आणण्यासाठी ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल असे सिंधिया यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. (Russia-Ukraine Latest News In Marathi)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.