laptop protest sakal
देश

मुला-मुलींना एकत्र बसण्यास केली मनाई, एकमेकांच्या मांडीवर बसून केला Laptop Protest

कॅम्पसच्या बाहेर बसस्टॉपवर शेडमधील एका लांब स्टीलच्या बाकावर मुला मुलींना एकत्र बसण्यास तिथे सातत्याने विरोध केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

केरळमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरलाय. विशेष म्हणजे या आंदोलनाला त्यांनी 'लॅपटॉप प्रोटेस्ट' असे नाव दिले. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल हे 'लॅपटॉप प्रोटेस्ट' म्हणजे नेमकं काय? आणि विद्यार्थी हा प्रोटेस्ट का करताहेत? चला तर जाणून घेऊया. (Students of Kerala college hold laptop protest against moral policing photos goes viral)

तिरुवनंतपुरम रेल्वे स्टेशनच्या उत्तरेस १३ किमी अंतरावर स्थित केरळमधील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय ओळखल्या जाणार्‍या त्रिवेंद्रम अभियांत्रिकी महाविद्यालयीन कॅम्पस, 250 एकर जागेवर पसरलेला आहे. हा देशातील सर्वात मोठ्या कॅम्पसपैकी एक आहे. या कॅम्पसच्या बाहेर बसस्टॉप आहे, जे बहुतेक विद्यार्थ्यांचे आवडते ठिकाण आहे. जिथे मुलं आणि मुली शेडमधील एका लांब स्टीलच्या बाकावर एकमेकांशी बोलत बसतात. मात्र मुला मुलींचं एकत्र बसण्यास तिथे सातत्याने विरोध केला जातो.

एकेदिवशी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या समोर एक विचित्र घटना घडली. मुले आणि मुली एकत्र बसू नयेत म्हणून तीन सीटचे असलेले लांब बेंच प्रत्येकी एका सीटमध्ये कापून टाकण्यात आले होते. जिथे 5 ते 6 लोक एकत्र बसू शकत होते तिथे आता फक्त तीन लोक बसायला जागा होती. या ‘मॉरल पोलिसिंग’ ला कंटाळून आता विद्यार्थ्यांनी 'लॅपटॉप प्रोटेस्ट सुरू केलाय.

या महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपलाही हे आवडले नाही आणि त्यांनी 'मॉरल पोलिसिंग' विरोधात आपला आक्षेप नोंदवत एक नवीन मार्ग शोधला. या मुला-मुलींचा एक ग्रुप एकमेकांच्या मांडीवर बसला आणि फोटो क्लिक केले आणि त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर केले. काही वेळातच हे फोटो प्रचंड व्हायरल झाले.

बसस्टॉपवरची हि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हारल झाली. काही वेळातच इतर विद्यार्थीही त्यांच्या इतर मित्रमैत्रीणीसोबत बस स्टॉपवर फोटो काढायला लागले.आणि याला त्यांनी लॅपटॉप प्रोटेस्ट असे नाव दिले.

सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलय.या प्रोटेस्टचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य प्रोटेस्टचे कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT