Suicide  sakal media
देश

‘आईचा गर्भ अन् कबर’ हेच मुलींसाठी सुरक्षित; सुसाईड नोटमध्ये उल्लेख

शाळा बदलूनही शोषण थांबत नसल्याने तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) अल्पवयीन मुलीने लैंगिक छळाला (Physical abuse) कंटाळून आत्महत्या (Students suicide) केली. ही मुलगी चेन्नईतील शाळेत अकरावीत शिकत होती. गेल्या आठवड्यात तिचा मृतदेह चेन्नईतील मंगडू येथील घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुसाईड नोट (Suicide note) सापडल्यानंतर संपूर्ण प्रकरण स्पष्ट झाले.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कोणत्याही मुलीने नातेवाईक आणि शिक्षकांवरही विश्वास ठेवू नये. मुलींसाठी नातेवाइकांची घरे आणि शाळाही सुरक्षित नाहीत. सर्व पालकांनी आपल्या मुलांना मुलींचा आदर करायला शिकवावे, असे मुलीने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. तरुणीने सुसाईड नोटच्या सुरुवातीला लैंगिक छळ थांबवा असे लिहिले आहे. यासोबतच मानसिक त्रासाचाही उल्लेख केला आहे. ‘फक्त आईचा गर्भ आणि कबर’ हेच मुलींसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचे मुलीने लिहिले आहे.

शोषणाचे प्रकरण मुलगी ज्या शाळेत आधी शिकली त्या शाळेशी संबंधित असू शकते, असे मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. शाळा बदलूनही शोषण थांबत नसल्याने तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुलीने स्वतःला त्या लोकांपासून दूर केले होते, असे मुलीच्या मैत्रिणींनी सांगितले.

लैंगिक छळ (Physical abuse) आता असह्य होत असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये (Suicide note) लिहिले आहे. तिला खूप त्रास सहन करावा लागला. पण तिचे सांत्वन करायला कोणी नव्हते. शोषणामुळे तिला अभ्यासात लक्ष घालता आले नाही. ती मानसिकदृष्ट्या इतकी अस्वस्थ होती की एका रात्री झोपही आली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT