Success Story : स्पायडरमॅनला कोण ओळखत नाही? अख्या जगाला आपल्या अजब नावाने आणि उड्या मारण्याने भुरळ पडणारा स्पायडरमॅन थोरामोठ्यांपासून सगळ्यांचा लाडका आहे. फ्रान्सच्या अलेन रॉबर्टने स्पायडरमॅनची भूमिका एकदम चपलखपणे साकारली आहे.
आता या विदेशी स्पायडरमॅनला तर सगळेच ओळखतात, पण स्वदेशी म्हणजेच भारतीय स्पायडरमॅनला आपल्यातले कितीजण ओळखतात? अहो आश्चर्यमच्या थाटात नाही म्हणणाऱ्या प्रत्येकाला भारतीय स्पायडरमॅन माहीतच असला पाहिजे. या इंडियन स्पायडरमॅनचं नाव आहे ज्योती राज. त्याला 'कोठी राजू' म्हणजेच मंकीकिंग किंवा इंडियन स्पायडरमॅन म्हणूनही ओळखलं जातं.
हा राज कोणत्याही आधाराशिवाय अवघ्या काही सेकंदात 100 फूट उंच भिंतीवर चढतो. भिंतीवर चढणं हा त्याचा एकमेव छंद आहे. तो लोकांना मदत करण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी हे करतो.
कर्नाटकातील सर्वात उंच अशा जॉग धबधब्याच्या प्रवाहाच्या उलट्या बाजूने चढण्याचा पराक्रम सुद्धा ज्योती राज याच्या नावावर आहे. 15 वर्ष झाले तो चित्रदुर्गाच्या भिंतीवर दोरी न बांधता किंवा हार्नेसशिवाय चढतोय. जॉग फॉलमध्ये पडलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बऱ्याचदा त्याने पुढाकार घेतलाय.पण 2018 मध्ये बचाव मोहिमेत मदत करताना त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला असता.
ज्योती राजचा जन्म 17 मे 1988 रोजी तामिळनाडूतील थेनी मध्ये झाला. पण, नंतर तो कर्नाटकात राहू लागला. हळूहळू तो इथं स्पायडरमॅन म्हणून प्रसिद्ध झाला. त्याला चित्रदुर्ग किल्ल्याच्या भिंतीवर चढताना पाहून लोकं आश्चर्याने तोंडात बोटं घालतात.
ज्योतीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा त्याला बघण्यासाठी गर्दी जमा होते तेव्हा त्याला आनंद होतो. तो उलटा लटकतो आणि त्याला इतक्या उंचीवर पाहून लोक घाबरतात. भिंतीवर चढताना त्यांना कसलीही भीती वाटत नाही.
अॅलेन रॉबर्टसारखं बनण्याची इच्छा
ज्योतीने सांगितलं होतं की, चित्रपटांमध्ये स्टंट पाहून आणि माकडांकडून भिंतीवर चढताना पाहून तो ही भिंतीवर चढायला शिकला. अॅलन रॉबर्ट हा देखील त्याच्या प्रेरणास्थानी आहे. त्याला नेहमी त्याच्यासारखं बनायचं होतं. भिंतीवर चढण्याची त्याची कला ही देवाने दिलेली देणगी आहे असं तो मानतो.
चित्रदुर्गात येणारे सर्व लोक आणि पर्यटक त्याचा खूप आदर करतात. ज्योती लहान मुलांना रॉक क्लाइंबिंग ट्रिक्स देखील शिकवतो. जॉग फॉलमध्ये पडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी त्याने अनेकवेळा मदत केलीय. 2018 सालची गोष्ट आहे. तो मृतदेह बाहेर काढण्यासाठी जॉग धबधब्याकडे गेला होता. पण, तो स्वतःच घसरला तेव्हा तिथं असलेली बचाव पथकाने त्याला बाहेर काढलं. ज्योती राजने आजवर 35 मृतदेह या धबधब्यातून बाहेर काढलेत.
ज्योती सांगतो, भिंतीवर, किल्ल्यावर चढताना नेहमी दुखापत होण्याचा धोका असतो. पण जोपर्यंत तो शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहे, तोपर्यंत त्याला कशाचीही पर्वा नाही. विशेष म्हणजे एकेकाळी तो चित्रदुर्ग किल्यावर जीव देण्यासाठी गेला होता पण आता तोच किल्ला त्याच्यासाठी प्रॅक्टिस ग्राऊंड आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.