Success Story 
देश

Success Story: ...जेव्हा आयुष्याच्या वळणावर यू-टर्न येतो! टायर पंक्चर काढणारा अहमद बनणार न्यायाधीश

Sandip Kapde

Success Story: 

आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जे आपलं संपूर्ण आयुष्य बदलतात. संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळत असते या संधीच ज्याला सोनं करता आलं तो विजेता ठरतो. अशाच एका विजेत्याची ही स्टोरी आहे. इतरांची पंक्चर झालेली गाडी वेगाने धावावी म्हणून टायर पंक्चर काढणाऱ्या अहद अहमद या २६ वर्षीय युवकाने आयुष्याची गाडी देखील ट्रॅकवर आणली. अहद अहमद आता दिवाणी न्यायाधीश बनणार आहे. अहद अहमद प्रयागराज गावात एका झोपडीत राहतो. त्याचे वडील आणि तो टायरचे पंक्चर काढण्याचे काम करतात. अहदने आपल्या कौशल्याने सर्वांनाच चकित केले.

अहद अहमद आता इतरांना न्याय मिळवून देईल. तो आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहत ज्या दिवशी तो त्याच्या त्याच्या आई आणि वडिलांना आरामदायी, अधिकृत निवासस्थानी हलवू शकेल. अहद याचे वडील शेहजाद अहमद आणि आई अफसाना बेगम यांचा मुलगा आहे.

अफसाना बेगम ह्या शिलाईचे काम करतात. प्रयागराजच्या शृंगवेरपूर ब्लॉकमधील बरई हरख गावात राहणाऱ्या या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा आहे. अहदच्या वडिलांची छाती अभिमानाने भरून आली आहे.

अहद अहमद याने आयुष्यातील अनेक खडतर डोंगर पार केले. तो प्रथम वकील झाला त्यानंतर प्रांतीय नागरी सेवा (न्यायिक) अंतिम परीक्षा पास केली. अहद, डिसेंबरमध्ये वर्षभराचे प्रशिक्षण सुरू करण्याची शक्यता आहे, तो दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) होईल.

अहद अहमद याच्या यशाचे श्रेय त्याचे वडील शेहजाद अहमद यांना देखील द्यायला हवे. ज्यांनी मेहनत घेऊन आपल्या तिन्ही मुलांना शिकवले. त्यांना शिक्षणाचे महत्व चांगले माहित आहे. त्यांचा मुलगा त्याचं उदाहरण आहे.  शेहजाद अहमद यांचा मोठा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. सर्वात लहान मुलगा बँकेत मॅनेजर आहे. तर मधला मुलगा अहद आता न्यायाधीश होणार आहे.

अहद अहमद याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "लॉकडाऊन दरम्यान न्यायाधीशांच्या परीक्षेची माझी तयारी सुरू झाली. आमची आर्थिक परिस्थिती मला कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाता आले नाही. त्यामुळे मी मोफत ऑनलाइन कोचिंग क्लासेसची मदत घेतली."

अहदची आई अफसाना बेगम म्हणाल्या, "माझ्या पतीची कमाई आम्हाला पोटापाण्याइतकीच होती. पण आम्हाला आमच्या मुलांना शिक्षण द्यायचे होते. म्हणून, मी अनेक वर्षांपूर्वी शिवणकाम सुरू केले. आम्ही दोघांनी खूप कष्ट केले आणि आमच्या प्रयत्नांना यश मिळाले"

कठीण परिक्षेचा अभ्यास करताना वडिलांनी कामत मदत कशी केली? टाइम्स ऑफ इंडियाने विचारलेल्या या प्रश्नावर अहद म्हणाला, "माझ्या वडिलांना टायर दुरुस्त करण्यास मदत केल्याने माझे मन शांत होते. या कामामुळे मला मदत मिळाली."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हॅरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT