president of india has nominated sudha murty to rajya sabha pm modi x post 
देश

Sudha Murthy: राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर सुधा मूर्ती पहिल्यांदाच झाल्या व्यक्त; म्हणाल्या, शाळेत...

सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवड झाल्याची घोषणा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांची नुकतीच राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवड झाली. यानंतर आज पहिल्यांदाच त्या आपल्या नियुक्तीवर व्यक्त झाल्या आहेत. लोकसभेत आपण कसं काम करणार यावर त्यांनी भाष्य केलं आहे. (Sudha Murthy spoke for first time after being appointed to Rajya Sabha MP by President)

पत्रकारांनी सुधा मूर्तींना विचारलं की, राज्यसभेत तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर काम करणार आहात? यावर त्यांनी उत्तर दिलं की, मी पहिल्यांदाच या शाळेत जात आहे. त्यामुळं मला ती शाळा समजून घेऊ द्या, त्याचा अभ्यास करु द्या. त्यानंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला याबाबत माहिती देईन. (Latest Marathi News)

राज्यसभा खासदार म्हणून तुमच्यासमोर कोणती आव्हानं आणि यश असेल? या प्रश्नाला उत्तर देताना मूर्ती म्हणाल्या, "मी तटस्थ आणि आनंदी आहे. मला आधी राज्यसभेत येऊ द्या आणि काम सुरू करु द्या. मी इतक्यात गोष्टींचा अंदाज लावत नाही" (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवड झाल्याची घोषणा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन केली होती. सुधा मूर्ती यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करत त्यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर निवड केली असून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा असं ट्विट पंतप्रधानांनी केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT