Suicide of a student in Chennai Suicide of a student in Chennai
देश

विद्यार्थिनीचा मृत्यू; जमावाने स्कूल बस पेटवली; दगडफेकीत २० पोलिस जखमी

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात एका खासगी शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूवरून (student Suicide) झालेल्या निदर्शनांना रविवारी (ता. १७) हिंसक वळण लागले. विविध विद्यार्थी संघटना आणि स्थानिक लोकांनी शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या बसेस जाळल्या. तसेच शाळेच्या मालमत्तेची तोडफोड करण्यात आली. पोलिसांच्या बसलाही आग लावण्याचे वृत्त आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुड्डालोर जिल्ह्यातील रहिवासी असलेली विद्यार्थिनी बुधवारी पहाटे वसतिगृहाच्या आवारात मृतावस्थेत (Death) आढळून आली. मुलीच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. विद्यार्थ्याच्या मृत्यूमागे कट असल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली आहे.

मुलीच्या शवविच्छेदन अहवालामध्ये रक्तस्राव आणि अनेक जखमांमुळे तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. शरीरावरील सर्व जखमांच्या खुणा ताज्या होत्या. मात्र, याबाबतचे अंतिम विधान सध्या राखून ठेवण्यात आले आहे. रासायनिक विश्लेषण अहवालाची प्रतीक्षा आहे.

या घटनेची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि स्थानिक लोक अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. चिन्ना सालेम-कल्लाकुरिची रस्त्यावर मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि स्थानिकांनी रविवारी वाहतूक रोखून धरली. यानंतर हे लोक कनियामूर येथील खाजगी निवासी शाळेकडे जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता जमावाने बॅरिकेड्स तोडून दगडफेक सुरू केली.

आंदोलकांनी विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी (CID) चौकशीची मागणी केली आहे. तसेच मृत्यूला जबाबदार असलेल्यांना अटक करण्याची मागणी केली. त्यांच्या मागण्यांना राजकीय संघटना आणि डाव्या पक्षाच्या युवा शाखेचा पाठिंबा आहे.

हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी कल्लाकुरिची जिल्हा पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर (Police) दगडफेक सुरू केली. यात पोलिस उपमहानिरीक्षक एम. पांडियन यांच्यासह २० हून अधिक पोलिस जखमी झाले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या.

न्यायासाठी आंदोलन

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर (student Suicide) आई-वडील, नातेवाईक, कुड्डालोर जिल्ह्यातील वेप्पूर येथील पेरियानासलूर या गावातील लोक न्याय मिळवण्यासाठी न थांबता आंदोलन करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT