शेकडो कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने दिल्ली अबकारी घोटाळ्याच्या तपासात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्याने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे.
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने अबकारी घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केली आहे. केजरीवाल सध्या दिल्लीतील तुरुंगात आहेत.
गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सुकेशने व्हॉट्सॲपवरील संभाषणाचा स्क्रीनशॉटही पुरावा म्हणून पाठवला आहे.
सुकेश चंद्रशेखरने ज्या लोकांशी संवाद साधला त्यात भारत राष्ट्र समितीच्या आमदार कविता, दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे
दरम्यान या पत्राबरोबर, सुकेश चंद्रशेखरने "अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया, कैलाश गहलोत आणि के. कविता यांच्या नेतृत्वाखालील कथित AAP सिंडिकेट" बाबत तपासात पूर्ण सहकार्य करण्याची आणि अतिरिक्त पुरावे देण्याची तयारी दर्शवली आहे.
या तक्रारीची तातडीने दखल घ्यावी आणि कायद्यानुसार गृहमंत्र्यांनी आवश्यक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सुकेशच्या म्हणण्यानुसार, चॅट तपशीलांमध्ये रोख व्यवहारांचा आरोप आहे. यामध्ये पैशासाठी ‘घी टिन’ हा सांकेतिक शब्द वापरण्यात आला आहे. त्यासाठी एक कोटी रुपये वापरण्यात आले.
कविता यांच्या सूचनेनुसार हैदराबादमधील त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही रोकड गोळा केल्याचा दावा सुकेशने केला आहे. ही रक्कम नंतर दिल्ली आणि गोव्याला पाठवण्यात आली. सुकेश म्हणतो की, या संभाषणातून के कविता, सत्येंद्र जैन आणि केजरीवाल यांचा व्यवहारात सहभाग असल्याचा पुरेसा पुरावा मिळतो.
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 21 मार्च रोजी संध्याकाळी चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.