Sukesh Letter To K Kavitha 
देश

Sukesh Letter To K Kavitha: 'केजरीवाल यांचे रक्षण...'; ईडीने अटक केलेल्या कवितांना कॉनमॅन सुकेशचं पत्र, केले गंभीर आरोप

Sukesh Chandrashekhar Letter To K Kavitha : कॉनमन सुकेश चंद्रशेखर हा सध्या २०० कोटींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरुंगात आहे. त्याने आता सध्या अटकेत असलेल्या भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या के कविता यांना पत्र लिहीलं आहे.

रोहित कणसे

Sukesh Chandrashekhar Letter To K Kavitha : कॉनमन सुकेश चंद्रशेखर हा सध्या २०० कोटींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरुंगात आहे. त्याने आता सध्या अटकेत असलेल्या भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या के कविता यांना पत्र लिहीलं आहे. या पत्रात सुकेशने अनेक गंभीर आरोप केले असून अखेर सत्याचा विजय झाला आणि त्यांना त्यांच्या कर्माची फळ मिळत असल्याचं म्हटलं आहे.

सुकेशने पाठवलेलं हे पत्र १८ मार्च (सोमवार) रोजी पाठवण्यात आलं आहे. या पत्रात दिल्लीच्या मद्य घोटाळा प्रकरणात अटक झाल्यानंतर के कविता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे एक्सपोज होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच कविता यांच्या अटकेनंतर भ्रष्टाचाराचा एक पिटारा उघडेल असा दावा त्याने केला आहे. विशेष म्हणजे या पत्रात कविता यांचा उल्लेख अक्का असा करण्यात आला आहे. अक्का या शब्दाचा तेलगूमध्ये अर्थ मोठी बहिण असा होतो.

अखेर सत्याचा विजय झाला आहे. खोट्या केसेसचं नाटक, खोटे आरोप, राजकीय सूड घेण्याचा प्रकार फसला आहे, तुमचे कर्म तुमच्याकडे परत येत आहे, असे सुकेशने त्याच्या पत्रात म्हटले आहे.

बीआरएस नेत्या आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता यांना ११ मार्च रोजी ईडीने अटक केली आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना सत्याचा सामना करावा लागेल असेही सुकेशने त्याच्या पत्रात म्हटले आहे.

तुम्हाला कायम वाटत राहिलं की तुम्हाला कोणी धक्का लावू शकत नाही.... पण तुम्ही विसरलात की हा नवा भारत आहे आणि पूर्वीपेक्षा आता कायदा अधिक मजबूत आणि शक्तिशाली बनला आहे असेही सुकेश त्याच्या पत्रात म्हणला आहे.

चंद्रशेखरने पुढे दावा केला की, त्याने गेल्या वर्षी एका प्रेस स्टेटमेंटमध्ये दोन गोष्टींचा उल्लेख केला होता, 2023 च्या विधानसभा निवडणुकांनंतर तेलंगणातील बीआरएस सत्तेतून बाहेर फेकले जाईल आणि तुमच्या अटकेसाठी काउंटडाउन आणि तिहार क्लबचा भाग बनवण्याची प्रक्रिया सुरू होईल, सध्या हे दोन्ही गोष्टी घडल्याचे दिसून येत आहे.

चंद्रशेखर याने के कविता यांच्या अटकेनंतर आणखी भ्रष्टाचाराबद्दल आणि खूप माहिती समोर येईल असा दावा देखील केला आहे. त्याने या पत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या घोटाळ्याचा म्होरक्या आणि गॉडफादर असल्याचे देखील म्हटले आहे.

भ्रष्टाचाराचा राजा, माझे प्रिय अरविंद केजरीवाल यांच्यासह तुमचे सर्व भ्रष्ट साथीदार एका वेगळ्या पातळीवर उघडकीस येणार आहेत. तुम्ही आणि तुमच्या पक्षाने सिंगापूर, हाँगकाँग आणि जर्मनीमध्ये लुटून लपवून ठेवलेले हजारो कोटी बाहेर उघडे पडतील.

तसेच चंद्रशेखर याने कविता यांना सल्ला दिला की, सर्व काही लपविण्याचा प्रयत्न करण्यात आणि केजरीवाल यांचे रक्षण करण्यात काही अर्थ नाही, तसेच त्याने केजरीवाल यांना या घोटाळ्याचे किंगपिन आणि गॉडफादर म्हटले आहे. तुमचा सर्व भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत... लवकरच भेटू, अक्का , आमने-सामने. मी तिहारच्या महान क्लबमध्ये तुमचे स्वागत करतो, असेही तो पुढे म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT