राजस्थानमधील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या दोन शूटरसह तिघांना राजस्थान पोलिस आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने चंदीगड सेक्टर 22 ए मधील एका हॉटेलमधून अटक केली आहे.
रोहित राठोड आणि नितीन फौजी अशी आरोपींची नावे आहेत. तर तिसऱ्याचे नाव उधम आहे. आरोपी फरार होत असातना उधम हा त्यांच्यासोबत होता. आरोपींकडून मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या तिघांना घेऊन दिल्ली पोलिस दिल्लीत दाखल झाले आहेत. पोलिसांचे पथक सर्वांना जयपूरला घेऊन जाणार आहे. सुखदेव सिंग गोगामेडी यांची जयपूर येथील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या संपूर्ण घटनेत एकूण 17 गोळ्या झाडण्यात आल्या.
शूटर्सनी गोगामेडी यांची हत्या केल्यानंतर शस्त्रे लपवून ठेवली होती. जेणेकरून पळून जाताना ट्रेन किंवा बसमध्ये ते पकडले जाणार नाहीत. फरार झाल्यानंतर आरोपी हल्लेखोर मोबाइल फोनचा वापर करत होते. टेक्निकल सर्व्हेलन्सच्या माध्यमातून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले.
पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले तेव्हा तिघेही एकत्र होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. हे हल्लेखोर गँगस्टर रोहित गोदाराचा राइट हँड वीरेंद्र चव्हाण आणि दानाराम यांच्या संपर्कात होते. वीरेंद्र चव्हाण आणि दानाराम यांच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आली. या दोघांना अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. हत्येनंतर दोन्ही हल्लेखोर वीरेंद्र चव्हाण आणि दानाराम यांच्याशी सतत बोलत होते. खून केल्यानंतर आरोपी राजस्थानहून हरयाणातील हिसार येथे पोहोचले, हिसारहून मनालीला गेले आणि मनालीहून चंदीगडला पोहोचले, जिथून त्यांना अटक करण्यात आली.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंह यांची हत्या केल्यानंतर आरोपी आधी रेल्वेने हिसारला गेला, हिसार ला पोहोचले आणि बसने मनालीला रवाना झाले. उधमबरोबर ते मनालीहून मंडी आणि नंतर चंदीगडला आले. ते चंदीगडमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते, तिथून त्यांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान नितीन फौजी याने कबूल केली की, राजस्थानचे मोस्ट वॉन्टेड आणि अत्याधुनिक शस्त्रांचा डिलर रोहित गोदारा आणि वीरेंद्र चरण यांच्याकडून हे काम करून घेण्यात आलं. त्याने पोलिसांना सांगितले की, 9 नोव्हेंबर रोजी त्याला खोट्या चोरीच्या गुन्ह्यात अडकवले जात होते. हरियाणा पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला आणि नंतर तो पळून गेला. पळून गेल्यानंतर आपली नोकरी जाईल आणि कुटुंबीय आता घरात घेणार नाहीत, हे फौजीला माहिती होतं.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तो गोदारा आणि चरणचा साथीदार रॉनी रापुट यांच्या संपर्कात आला. गोगामेडीला ठार मारण्यास मदत केल्यास कॅनडासाठी बनावट पासपोर्ट आणि व्हिसाची व्यवस्था करू, असे या तिघांनी फौजीला सांगितले. जयपूर पोलिसांनी काल अटक केलेल्या आरोपी सोमवीरने रोहित राठोड यांच्याशी संपर्क साधला. रोहितचा गोगामेडी यांच्याशी वाद झाला होता. रोहितने नवीन शेखावतलाही आपल्यासोबत जोडले. शेखावत याला मात्र या संपूर्ण प्लॅनची माहिती नव्हती. त्यानंतर दोघेही डीडवाना येथे पळून गेले. त्यानंतर ते दारुहेरा येथे पोहोचले.
पहिला पुरावा येथेच मिळाला होता. आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज आढळून आलं होतं. राजस्थान पोलिसांनी दिल्ली स्पेशल शेलच्या मदतीने मोनी मानेसर सहित भोंडसी जेलमध्ये कैदेत असलेल्या कैद्यांची देखील चौकशी केली. आरोपी रोडने जयपूरहून डीडवाना-सुजानगड-दारूहेडा पर्यंत पोहचले. पुढे ते बसने मनालीला पोहचले आणि परत चंदीगड सेक्टर 22 मध्ये पडकले गेले.
नितीन फौजी याला बनवट पासपोर्ट आणि कॅनडामध्ये राहण्याची सोय अशी ऑफर देण्यात आली होती. तर रोहित ने जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी गोगामेडी यांची हत्या केली, गोदारा आणि गोगामेडी यांच्यात जमीनीवरून वाद सुरू होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.