An Indian Air Force C-130J Super Hercules transport aircraft 
देश

Kuwait Fire: हवाई दलाचं 'सुपर हर्क्युलस' विमानाचं कुवेतच्या दिशेनं उड्डाण; भारतीय मजुरांचे मृतदेह आणणार मायदेशी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कुवेतमध्ये बांधकाम मजुरांच्या इमारतीला लागलेल्या आगीत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ४२ जण भारतीय होते. तसंच या भीषण दुर्घटनेत सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाच्या सुपर हर्क्युलस विमानानं कुवेतच्या दिशेनं उड्डाण केलं आहे. या विमानातून भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणण्यात येणार आहेत. (Super Hercules aircraft has left for Kuwait to bring back bodies of Indian origin people)

भारतीय हवाई दलाचं सुपर हर्क्युलस C130J हे मालवाहू विमान आहे. मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणायचे असल्यानं सरकारनं हे विमान कुवेतमध्ये पाठवलं आहे. हे विमान उद्यापर्यंत भारतात परतेल असंही सांगण्यात येत आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

दरम्यान, बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या दरम्यान ही भीषण आगीची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर कालच परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह हे कुवेतला रवाना झाले आहेत. याठिकाणी पोहोचताच सिंह यांनी जखमी मजुरांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. तसंच ज्या भारतीय मजुरांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची नुकसान भरपाई पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आहे.

अल मनगाफ नावाच्या इमारतीला आग लागली होती जी दक्षिण कुवेतमधील अल अहमदी इथं होती. एबीटीसी या बांधकाम कंपनीनं ही इमारत आपल्या मजुरांच्या निवासासाठी भाड्यानं घेतली होती. या ठिकाणी एकूण १९५ मजूर राहत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT