CRPF Jawan sakal
देश

Jawan Childrens : जवानांच्या पाल्यांना तांत्रिक शिक्षणाचा आधार

केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेले आणि शौर्य पदक विजेत्या जवानांच्या पाल्यांना उच्च तंत्रशिक्षण मिळावे म्हणून पुढाकार घेतला आहे.

पीटीआय

चेन्नई - केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेले आणि शौर्य पदक विजेत्या जवानांच्या पाल्यांना उच्च तंत्रशिक्षण मिळावे म्हणून पुढाकार घेतला आहे. या मुलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), संगणक विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील शिक्षण घेता येईल त्यासाठी आघाडीच्या शिक्षण संस्था आणि विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

आतापर्यंत ३१ विद्यापीठांसोबत याबाबतचे सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातील २२ विद्यापीठे ही एकट्या तमिळनाडूतील आहेत. मागील वर्षीच हा उपक्रम सुरू करण्यात आला होता आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत, असे एका ‘सीआरपीएफ’च्या अधिकाऱ्याने सांगितले. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे शिकवणी शुल्क हे पूर्णपणे माफ करण्यात येते.

संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना केवळ वसतिगृह आणि खानावळीचेच शुल्क भरावे लागते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण सात श्रेणींची निर्मिती करण्यात आली आहे. कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या जवानांच्या पाल्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येतो त्यानंतर कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या जवानांच्या पाल्यांना संधी देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता बारावीमध्ये संबंधित विद्यार्थ्याने किमान साठ टक्के एवढे गुण मिळविणे आवश्यक आहे.

कर्तव्य बजावताना आपले प्राण पणाला लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यांची मुले आणि कुटुंबीयांसाठी आम्ही आणखी काही उपक्रम राबविण्याच्या विचारात आहोत.

- एम. दिनकरन, ‘सीआरपीएफ’चे उपमहासंचालक

कार्तिकाला मिळाली संधी

हुतात्मा हेड कॉन्स्टेबल एम. सुब्रह्मण्यम यांची कन्या कार्तिका. एस हिने चेंगलापट्टू जिल्ह्यातील ‘एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी’मध्ये प्रवेश घेतला असून तिथे ती उच्चशिक्षण घेत आहे. सुब्रह्मण्यम हे छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात २०१० मध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले होते. कार्तिकाप्रमाणेच अन्य दोन विद्यार्थी संगणकीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.

मी आता बी.टेकच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चौथ्या वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. मला या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून ‘सीआरपीएफ’ने सर्वोतपरी मदत केली. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जे केले असते तेच ‘सीआरपीएफ’ने केले आहे.

- कार्तिका एस. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक

या राज्यांतील संस्थांशी करार

  • २९७ - संस्थांनी देऊ केलेल्या जागा

  • १८- २० लाख - माफ झालेले शुल्क

  • ३.२५ लाख - ‘सीआरपीएफ’चे एकूण जवान

  • २ हजार २६२ - आतापर्यंत हुतात्मा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT