New Delhi News : सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात एखादा फेक मेसेज किंवा अफवा पसरवणं सहज सोपं बनलं आहे. व्हॉट्सअॅपवरुन तर क्षणार्धात असे मेसेजेस सर्वदूर पोहोचण्यास मदत होते. अशाच प्रकारे या व्हॉट्सअॅप विद्यापीठात देशाच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नावे एक फेक मेसेज फिरतोय. याची गंभीर दखल सुप्रीम कोर्टाच्या सरचिटणीसांनी घेतली आहे. (Supreme Court CJI D Y Chandrachud Fake Message circulating on WhatsApp)
लाईव्ह लॉ शी बोलताना सुप्रीम कोर्टाचे सरचिटणीस अतुल कुऱ्हेकर आणि सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी सांगितलं की, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावे फिरत असलेला मेसेज हा फेक मेसेज आहे. व्हॉट्सअॅपवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या फोटोसह इंग्रजी आणि हिंदीमध्ये मेसेज फिरत आहे, पण यामध्ये म्हटलेलं विधान सरन्यायाधीशांनी केलेलं नाही. तसेच तुषार मेहता यांनी सांगितलं की या मेसेजसंदर्भात कडक कारवाई करण्यात येणार आहे.
'भारतीय लोकशाही सुप्रीम कोर्ट झिंदाबाद' अशा मथळ्याखाली हा मेसेज फिरतो आहे. यामध्ये म्हटलंय की, "आपलं भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पण तुमचा पाठिंबा देखील यासाठी महत्वाचा आहे. यासाठी सर्व लोकांनी एकत्र यायला हवं तसेच सरकारविरोधात रस्त्यावर उतरुन त्यांना जाब विचारा.
हुकुमशाही सरकार लोकांना घाबरवेल, धमकावेल पण तुम्ही घाबरण्याची गरज नाही. धैर्य कायम ठेवा आणि सरकारला याची जबाबदारी घेण्यास पार पाडा मी तुमच्यासोबत आहे" या मेसेजच्या खाली सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड असं लिहिलं आहे.(Latest Marathi News)
अॅड. तुषार मेहता म्हणाले, हा फेक फॉरवर्ड मेसेज आहे. सरन्यायाधीश असं कधीही म्हणू शकत नाहीत. सरन्यायाधीशांच्या नावानं फॉरवर्ड होणाऱ्या अशा फेक मेसेजबाबत कडक पावलं उचलली जातील असंही यावेळी मेहता म्हणाले.
या सर्व प्रकरणावर सरन्यायाधिशांच्या कार्यालयातून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण या संपूर्ण विषयाबाबत सुप्रीम कोर्टाकडून अधिकृत निवदेन जाहीर केलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
सुप्रीम कोर्टानं याबाबत निवेदन प्रसिद्ध करत या मेसेजबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. खोटं, वाईट हेतूनं आणि खोडसाळपणे हा प्रकार केल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.