Supreme Court dismissed petition stating that we have to establish special court BJP leader and lawyer Ashwini Upadhyay sakal
देश

‘आम्हाला विशेष कोर्ट स्थापन करावे लागेल’ असे सुनावत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

देशभरातील शाळांमध्ये समान गणवेश सक्तीचा करावा, याबद्दलची याचिका गुरुवारी फेटाळली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘जर तुम्ही रोज एक जनहित याचिका दाखल केली तर आम्हाला एक विशेष न्यायालय स्थापन करावे लागेल,’’ असे सर्वोच्च न्यायालयाने भाजप नेते व वकील अश्‍विनी उपाध्याय यांची देशभरातील शाळांमध्ये समान गणवेश सक्तीचा करावा, याबद्दलची याचिका गुरुवारी फेटाळली. उपाध्याय यांच्या मुलाने ही याचिका केली असून त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती. हिजाबच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्याच वेळी समान गणवेशावरही सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी आज ती फेटाळली.

‘‘मी तुम्हाला अनेकदा सांगितले आहे. तुम्ही रोज एक जनहित याचिका दाखल करायला लागला तर आम्हाला एक विशेष न्यायालय स्थापन करावे लागेल. तुम्ही किती वेळा याचिका दाखल करणार आहात?, तुम्ही रोज एक जनहित याचिका दाखल करीत आहात. हिजाबची याचिका खूप पूर्वीच दाखल झाली आहे. क्षमा करा,’’अशा शब्दात सरन्यायाधीशांनी उपाध्याय यांना खडसावले. सरन्यायाधीश रमणा म्हणाले, की प्रत्येक प्रकरणात तुम्ही जनहित याचिका दाखल करू शकत नाही. संसदेत कामकाज चालत नाही का?. उपाध्याय यांनी पूर्वी दाखल केलेल्या एका याचिकेवरही सरन्यायाधीशांनी अशा प्रकारचे विधान केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT